Type Here to Get Search Results !

टाऊन प्लॅनिंग म्हणजे काय रे भाऊ ? राहुरी नगरपालिकेतील त्या टाऊन प्लॅनिंग नकाशाची जोरदार चर्चा

 टाऊन प्लॅनिंग म्हणजे काय रे भाऊ ?

राहुरी नगरपालिकेतील त्या टाऊन प्लॅनिंग नकाशाची जोरदार चर्चा 



राहुरी   [ विशेष वृत्त ]



सध्या सर्वत्र पालिका महापालिका क्षेत्रात अतिक्रमण हटाव मोहीम शिगेला पोहोचलेली दिसून येत आहे , त्यातच राहुरी शहर व परिसरातील


 अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे सर्वसामान्यांचे जणू कंबरडे मोडल्याचे चित्र आहे सरसकट शहरातील अतिक्रमण काढण्याची मागणी पुढे देखील आलेली आहे .



त्यामुळे राहुरी पालिका प्रशासन विरोधात नागरिक व्यावसायिकांचा प्रचंड रोष पहावयास देखील मिळत आहे . आता पुढील काळात पालिका प्रशासन काय करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना राहुरी नगरपालिकेतील टाऊन प्लॅनिंग च्या नकाशाची जोरदार चर्चा सुरू आहे .






साधारणतः 2000 ते 2003 या काळातील हा टाऊन प्लॅनिंगचा शहर विकास आराखड्याचा नकाशा पालिका कार्यालयात उपलब्ध असून त्यात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यांवर नऊ मीटर , बारा मीटर , अशी आरक्षण दाखवण्यात आलेली आहेत . याशिवाय निवासी क्षेत्र , पूररेषा , प्रपोज रोड , मैदाने ,पार्किंग , पालिकेच्या विविध ठिकाणी असणाऱ्या जागा , कृषी व औद्योगिक क्षेत्र , असे विविध सर्व नंबर मध्ये आरक्षण दाखविण्यात आलेली आहे .

शहर विकास आराखडा तथा टाऊन प्लॅनिंग चा त्या काळात पूर्ण झाल्यानंतर यांच्याकडून राहुरी नगरपालिका सभागृहात तो मांडल्यानंतर त्यावर चर्चा झाली होती . शहरवासीयांकडून त्याबाबत सूचना व हरकती देखील मागवल्या गेल्या होत्या . सभागृहात मुख्यअधिकारी , नगराध्यक्ष , टाऊन प्लॅनिंग ऑफिसर , यांच्या सह्यांनी त्यावर मंजुरीसाठी विषय देखील ठेवण्यात आला होता . असे विषय मंजूर झाल्यावर ते कायद्यामध्ये आपोआप रूपांतरित होतात . मात्र या शहर विकास आराखडा बाबत दोन तप उरकली तरीही बहुतांश शहरवासीयांना याची कल्पना देखील नव्हती . एवढेच नव्हे तर पालिकेकडून कुठल्याही प्रकारे सांगण्यात आले नसल्याचाही आक्षेप नागरीकांकडून केला जात आहे .

आता अतिक्रमणांमुळे शहरवासी यांचे कंबरडे मोडले असताना या टाऊन प्लॅनिंग बाबत जोरदार चर्चा सुरू असून पालिका प्रशासनाने योग्य तो खुलासा करावा अशी मागणी शहरवासीयांकडून करण्यात येत आहे .

Post a Comment

0 Comments