राहुरी पोस्ट ऑफिस येथे जागतिक महिला दिन उत्साहात
राहुरी - महेश कासार पत्रकार
जागतीक महिला दिनानिमित्त. डिव्हीजन कार्यालय व डाक अधिक्षक श्रीरामपूर यांचे मार्गदर्शन खाली , राहुरी पोष्ट ऑफीस मध्ये जागतिक महिला दिन साजरा कण्यात आला.
पोस्ट कार्यालयात येणार्या महिला ग्राहकांचा सन्मान करण्यात आला तसेच पोस्टतील महिला बचत एजंट यांचा यथोचित सन्मान करण्यात आला या प्रसंगी शहरातील नामवंत स्त्री रोग तज्ञ डॉ मनिषा ढुस याचा राहुरी पोस्ट कार्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला
पोस्टाच्या वतीने महिला सन्मान योजना, लहान मुलींसाठी सुकन्या योजना ,पब्लिक प्राव्हिडंट फंड, जेष्ठ नागरिक योजना याची सविस्तर माहिती सब पोस्ट मास्तर शारदा पानसंबळ यानी दिली या प्रसंगी चिंचाळे येथील ब्रँच पोस्ट मास्तर आश्विन पैले, महिला एजंट स्वाती जोशी, मीना फडके, सुजाता क्षीरसागर, नांगरे मँडम आदिसह मोठ्या संख्येने महिला ग्राहक उपस्थित होत्या
(महेश कासार राहुरी)



Post a Comment
0 Comments