राहुरीत दोन महिन्यांपासून जिहादी , विद्रोही व्यक्तीचं दंगल घडविण्याचे होते षडयंत्र - संघटनांचा आरोप
राहुरीतील पुतळा विटंबनाप्रकरणी आरोपींचा अद्याप शोध नाही
राहुरी ( प्रतिनिधी )
दिनांक २६ मार्च २०२५ रोजी राहूरी शहरात अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेमुळे समाजाचा भावना दुखावुन समाज रस्त्यावर उतरला त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले .
प्रशासनाने वारंवार केलेल्या विनंतीला मान देऊन व दोन दिवसांत आरापी पकडू या आश्वासनावर विश्वास ठेवुन हिंदु समाजाने आंदोलन व बंद मागे घेतले.
परंतु ६ दिवस उलटुन जाऊन पण अजुनपर्यंत आरोपीचा शोध लागलेला नाही . यातुन प्रशासनाचा वेळकाढुपणा अकार्यक्षमता व दिरंगाई दिसुन येत आहे . त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदु समाजाच्या मनात प्रचंड संताप व चिड निर्माण झालेली आहे. काही जिहादी प्रवृतीचे लोक, तालुक्यातील डाव्या विचारांच्या संघटना व स्वताला विद्रोहि म्हणवणारा एक हेतुपुर्वक या प्रकरणामधे प्रशासनावर दबाव टाकुन व खोटी माहिती देऊन हिंदु मुलांना अडकवून संपूर्ण हिंदु समाजाला बदनाम करुन , संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा करत आहे.
मिळालेल्या माहितीवरुन गेल्या दोन महिन्यांपासुन हे जिहादी, डावे व विद्रोहि लोक बुवासिद्धदेव मंदिराच्या परिसरात विविध संशयीत हालचाली करुन शहरात दंगल घडवून आणण्याचे कारस्थान करु पाहत होते. मंदिराच्या शेजारी असलेल्या मुस्लीम वस्तीमधे व मंदिर परिसरामधे या विद्रोहि व्यक्तिचा कायम वावर असतो. परिसरातील जिहादी व विद्रोहि लोकांबरोबर याच्या सततच्या बैठका चालु होत्या.
घटनेच्या दिवशी व्यक्ती राहुरी शहरात उपस्थित होती व घडणार्या प्रत्येक घडामोडिवर बारीक लक्ष ठेवुन होती. घटना घडल्यावर लगेचच फेसबुक अकाउंटवर संबंधित नी केलेल्या पोस्टवरुन असे लक्षात येत आहे कि , आरोपी नेमके कोण आहेत हे घटना घडल्यापासुन त्या ना माहिती आहे.
यावरुन असे दिसुन येत आहे कि , याच जिहादी, डावे व तो विद्रोहि समाजकंटक यांनीच दंगल घडवुन आणुन सामाजिक शांतता मिटविण्यासाठी आपल्या हस्तकांमार्फत महाराजांच्या पुतळ्याची विटंबणा घडवुन आणली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सदर जिहादी लोक, डाव्या संघटनांचे नेते व त्या विद्रोहि समाजकंटकाला ताबडतोब अटक करुन त्यांची सिबीआय द्वारे चौकशी करावी व तात्काळ घटनेचा तपास करुन खर्या आरोपीला अटक करावी.
खर्या आरोपीला अटक न करता या वरील समाजकंटकाच्या दबावाला बळी पडुन प्रशासनाने निरपराध हिंदुंना अडकवण्याचे काम करु नये , अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रात हिंदु समाज रस्त्यावर उतरेल.
आरोपींना तात्काळ अटक न झाल्यामुळे व सदर प्रकरणाची चौकशी सिबीआय कडे या मागणीसाठी संपूर्ण जिल्हा व महाराष्ट्रातील हिंदु समाजाला बरोबर घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निम झाल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सकल हिंदू समाज ने हे निवेदन पोलीस निरीक्षक राहुरी , DySP पोलीस उपअधीक्षक , एसपी (पोलीस अधीक्षक) , आयजी (पोलीस महानिरीक्षक) , DG (डायरेक्ट जनरल ऑफ पोलिस) , गृहमंत्री ,मुख्यमंत्री आदींना पाठवले आहे .


Post a Comment
0 Comments