माजी नगराध्यक्ष स्व. बापुसाहेब कोरडे यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन
राहुरी ( प्रतिनिधी )
गुडीपाडवा ” मराठी’ नवींन वर्ष 2025 . चैत्र मास मुहर्तावर स्व. बापुसाहेब पंढरीनाथ कोरडे (मा. नगराध्यक्ष. राहुरी नगर परिषद ) यांच्या स्मरणार्थ पाणपोईचे उद्घाटन.
सेवानिवृत्त मंडलाधिकारी वडीतके भाऊसाहेब व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी शरद पाटील सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक एम एम पाचारणे,इरुळे भाऊसाहेब, काकारामजी काकडे, शेजुळं काका , सेवानिवृत्त प्रिन्सिपल प्रकाश कोरडे सर, भारत कोरडे, राहुरी तालुका नाभिक अध्यक्ष सुजित कोरडे,गणेश कोरडे, आणि राहुल कोरडे यांच्या उपस्थितीत “श्री पंढरी”शुभ मंगल कार्यालय , मल्हारवाडी रोड राहुरी येथे संपन्न झाला. गेल्या अकरा वर्षापासून दर उन्हाळ्यामध्ये अविरत हा पाणीपोईचा उपक्रम कोरडे परिवारामार्फत चालला जात असल्याने वाटसरूंना याने मोठा दिलासा मिळत आहे. तीव्र कडाक्याच्या उन्हामध्ये मध्ये वाटसरूंना थंडगार पाणी प्यायला मिळत असल्याने कोरडे परिवाराच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.


Post a Comment
0 Comments