Type Here to Get Search Results !

जिल्ह्यातील या तीन बाजार समित्या झाल्या थ्री स्टार

जिल्ह्यातील या तीन बाजार समित्या झाल्या थ्री स्टार



 राहुरी ( प्रतिनिधी )

नगर जिल्ह्यातील तीन बाजार समित्यांचा थ्री स्टार म्हणून नुकताच समावेश करण्यात आला आहे.

त्यात राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे .

    राहुरी तालुक्याचे भाग्यविधाते डॉ. दादासाहेब तनपुरे यांनी स्थापन केलेल्या या बाजार समितीवर सभापती अरुण तनपुरे यांची एक हाती सत्ता असून या बाजार समितीचा कारभार राज्यभर सर्वश्रुत आहे .

 अहिल्यानगर येथून प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार , राज्यात एकूण 305 कृषी उत्पन्न बाजार समिती असून 625 उप बाजार समिती आहेत. उत्पन्नानुसार त्यांचे वर्गीकरण करण्यात आले असून दहा ते पंचवीस कोटी उत्पन्न असणाऱ्या बाजार समितीचा समावेश अ वर्ग ( फोर स्टार ) करण्यात आला असून अहिल्यानगर बाजार समितीचा त्यात समावेश करण्यात आला आहे .

 पाच ते दहा कोटी रुपये पर्यंत उत्पन्न असणाऱ्या बाजार समितीचा समावेश वर्ग ( थ्री स्टार ) बाजार समितीमध्ये करण्यात आला असून त्यात राहुरी , नेवासा , राहाता ,बाजार समिती यांचा समावेश करण्यात आला आहे .

 अडीच कोटी ते पाच कोटी उत्पन्न असणाऱ्या अ वर्ग ( टू स्टार ) बाजार समिती समावेश करण्यात आलेल्या बाजार समितीमध्ये श्रीरामपूर , संगमनेर , कोपरगाव , पारनेर , जामखेड , शेवगाव या बाजार समिती यांचा समावेश आहे .

1950 मध्ये तालुक्याची भाग्यविधाते डॉ. दादासाहेब तनपुरे यांनी स्थापन केलेल्या बाजार समितीचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून , राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश थ्री स्टार मध्ये करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे .

Post a Comment

0 Comments