Type Here to Get Search Results !

शिवरायांच्या पुतळा विटंबना प्रकरणी या माजी राज्यमंत्र्यांच्या बेमुदत उपोषणाकडे शासन प्रशासनाने फिरवली पाठ ; प्राजक्त तनपुरे यांचे उपोषण सुरूच

शिवरायांच्या पुतळा विटंबना प्रकरणी या माजी राज्यमंत्र्यांच्या बेमुदत उपोषणाकडे शासन प्रशासनाने फिरवली पाठ ; प्राजक्त तनपुरे यांचे उपोषण सुरूच

राहुरी ( विशेष वृत्त )

माजी राज्यमंत्री यांचे सायंकाळपर्यंत उपोषण सुरू असूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचे चित्र दिसून येत आहे . वीस दिवसांपूर्वी राहुरीत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याप्रकरणी सणाला अजूनही आरोपीचा शोध लागत नाही .

 अनेक संघटनांनी प्रशासनाकडे या विटंबना प्रकरणातील आरोपी जेरबंद करावा , या मागणीसाठी आंदोलने केली . मात्र अद्यापही यातील आरोपी पोलीस शोधून काढू शकले नाही . माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर बेमुदत उपोषणाचा मार्गाचा अवलंब आज केला .

 आज सकाळी राहुरी शहरातील प्रसिद्ध राहू केतू शनी मंदिराशेजारी तनपुरे शेकडो शिवप्रेमींसह बेमुदत उपोषणाला बसले . अनेक स्थानिक संघटनांनी या बेमुदत उपोषणाला आपला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबतीत पोलीस प्रशासन व तालुका प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झाली नसल्याचे दिसून आले आहे . पोलीस व प्रशासना सोबतच शासनाविरोधात राहुरीत रोष व्यक्त केला जात आहे .

राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाची विटंबना होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप पर्यंत आरोपी पकडण्यात आलेले नाही .राहुरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास करणे अत्यंत गरजेचे होते. सध्याची परिस्थिती पाहता तपासाची कोणतीही वेगवान चक्रे फिरलेली दिसत नाही. राज्य शासन छत्रपतींच्या नावाने राज्यकारभार करण्याची ग्वाही देतात गुणगौरव गातात तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात विविध ठिकाणी विटंबनाच्या घटना घडलेल्या असतानाही तपास मात्र तडीला जात नाही ही खेदाची बाब आहे. शासनाने विषय फारसा गांभीर्याने घेतला नसल्यामुळे शिवप्रेमींना उपोषण हाती घ्यावी लागले ही दुर्दैवाची बाब असल्याचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. आज सोमवारी श्री तनपुरे यांनी शनी चौक येथे आमरण उपोषणास प्रारंभ केला त्यावेळी ते बोलत होते. राहुरीत एवढी मोठी घटना घडली असताना नागरिकांनी संयम ठेवत पोलिसांवर जबाबदारी सोपवली परंतु यात फारशी प्रगती झालेली नाही. बंद ठेवून रास्ता रोको करून सर्वसामान्यांना त्रास होतो त्या ऐवजी आता आत्मक्लेश आंदोलन करावे लागत आहे .यापूर्वी दोन दिवस राहुरी बंद होती तालुक्यातील विविध गावांनी ही बंद ठेवून निषेध केला परंतु तपासात कोणतीही गतिमानता दिसली नाही हे प्रकरण विसरण्यासारखे नाही कोकणातही वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला राहुरीत विटंबना झाली एका मागे एक घटना घडत आहे केवळ तपास चालू आहे या सबबीखाली वेळ काढूपणा चालल्याचे दिसत आहे विद्यमान आमदारांनाही केवळ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करण्याची हौस दिसत आहे. आरोपी कोणत्याही समाजाचा असो तो जनतेसमोर आणून त्यास कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी सर्वांचीच मागणी आहे या मागणीचा विचार करून पोलिस प्रशासनाने आता शिवप्रेमींचा अंत न पाहता अधिक सखोल व तातडीने तपास करून आरोपींना अटक करण्याची गरज असल्याचे श्री तनपुरे यांनी स्पष्ट केले. या उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, रिपब्लिकन पक्ष, प्रहार संघटना, तुळजाभवानी सेवा ट्रस्ट , निळ वादळ युवा प्रतिष्ठान, सत्यशोधक लहुजी क्रांती सेना, अखिल भारतीय क्रांती सेना, यासह विविध संघटना ,सेवा संस्था, ग्रामपंचायत, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी यांनी पाठिंबा जाहीर केला. आजच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपोषणात सहभागी झाले. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली व तपासाची माहिती दिली.

Post a Comment

0 Comments