Type Here to Get Search Results !

अखेर राहुरीतील "त्या" बहुचर्चित वास्तूच्या भूमिपूजनाला ठरला मुहूर्त

अखेर राहुरीतील "त्या" बहुचर्चित वास्तूच्या भूमिपूजनाला ठरला मुहूर्त


राहुरी - सतर्क खबरबात जिल्ह्याची ( विशेषवृत्त )

         गेल्या दोन दशकाहून अधिक काळापासून प्रलंबित व बहुचर्चित राहुरी पोलीस स्टेशन इमारतीचा भूमिपूजन समारंभ येत्या रविवारी 27 एप्रिल 2025 रोजी थाटामाटात होत आहे .



          नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तर अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे . महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ , मुंबई ( मर्यादित ) अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन इमारतीचा इमारतीचे काम होणार आहे .

          दरम्यान , नेमकी पोलीस इमारत की वसाहत होणार ? राहुरी पोलीस स्टेशन इमारत आणि पोलीस निवास वसाहत त्याबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे .

गेल्या सहा ते सात दशकांकून अधिक काळापासून प्रलंबित असलेल्या राहुरी पोलीस वसाहतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागत आहे . 20 ते 25 वर्षांपासून राहुरी पोलीस स्टेशन लगतची पोलीस कर्मचारी वसाहत जीर्ण अवस्थेत व पूर्णपणे पडझड झालेली होती . या पोलीस वसाहतीत साधारणतः पाच चाळींमध्ये 40 ते 45 पोलिसांची निवासस्थानी होती . पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांना ये - जा करण्यासाठी गोकुळ कॉलनी ,सौ भागीरथीबाई तनपुरे शाळेसमोर एक खुश्किचा मार्ग देखील होता . हा खुश्किचा मार्ग माहिती नाही असा पोलीस विभागाचा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही , असे गमतीने म्हटले जाते .

          दिवस-रात्र कायदा व सुव्यवस्थेसाठी राब राब राबणाऱ्या पोलीस दादांच्या घराचा मात्र प्रश्न मोठ्या कालखंडापासून जैसे थे होता . राहुरीत बदलून आलेले अनेक पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना

 कुटुंबीयांसाठी बाहेरील गावाहून ये - जा करावी लागते. तसेच सर्व परिसरात भाडोत्री रूम किंवा भाडोत्री फ्लॅट घेऊन राहावे लागते. अनेकांना आपल्या मुलांच्या शाळांचा देखील प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा लागते. 

अनेक जिल्हा पोलीस प्रमुख , उपविभागीय पोलीस अधिकारी , पोलीस निरीक्षक यांनी शासनाकडे तसेच पोलीस विभागाचे पोलीस महासंचालक कार्यालय कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवले होते . सदरचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत होते . मात्र आता या पोलीस कर्मचारी वसाहतीचा प्रश्न मार्गी लागत आहे . साधारणतः 935 स्क्वेअर मीटर्स मध्ये बहुमजली अशी पोलीस कर्मचारी वसाहत लवकरच होणार आहे .

        या इमारतीचा प्लॅन अर्थात आराखडा तयार झाल्यावर बुलढाणा ( मेहेकर ) येथील ठेकेदार कंपनीला इमारत तयार करण्याचे कंत्राट दिल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली . इमारत कशी होणार व ती कधी पूर्ण होणार ? याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे .

गेल्या 20-25 वर्षांपासून राहुरी पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस अधिकारी , डी वाय एस पी , जिल्ह्याचे एसपी अर्थात जिल्हा पोलीस प्रमुख , विभागीय पोलीस अधिकारी तसेच तत्कालीन पोलीस महासंचालक दर्जाच्या सर्वच अधिकाऱ्यांनी यात जातीने लक्ष घातले होते . त्या सर्वांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे .




Post a Comment

0 Comments