Type Here to Get Search Results !

दिग्गज व मान्यवरांच्या " या " संस्थांच्या संचालक मंडळ निवडणुकांचा वाजला बिगुल

दिग्गज व मान्यवरांच्या " या " संस्थांच्या संचालक मंडळ निवडणुकांचा वाजला बिगुल


राहुरी ( प्रतिनिधी )

        राहुरी तालुक्यातील 20 सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून पाच जून 2025 पर्यंत या निवडणुका पार पडतील . बहुतांश संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे .


          तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) दीपक पराये यांनी या निवडणुकीचा प्रकटीकरण जाहीर केले आहे .

 13 मे 2025 ते 19 मे 2025 अर्ज दाखल करणे , 

उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 20 मे रोजी छाननी तर वैध उमेदवारांची यादी 21 मे रोजी जाहीर होणार आहे .

            21 मे ते चार जून अर्ज मागे घेण्याची मुदत असून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप व उमेदवार यादी पाच जून 2025 रोजी जाहीर होईल .

या सर्व सहकारी पतसंस्था , संस्था , क्रेडिट सोसायटी यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे होणारे मतदान , मतमोजणी व निकाल याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक ( सहकारी संस्था ) दीपक पराये हे घेतील .

        सध्या गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्था , जिल्हा परिषद , पंचायत समिती , महानगरपालिका , नगरपालिका , यांच्या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर शेतकरी , मजूर. व्यापारी, ठेवीदार यांचे घट्ट नाते असणाऱ्या राहुरी तालुक्यातील 20 सहकारी संस्था , क्रेडिट सोसायटी व अन्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सध्या याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे .

        संचालक मंडळाच्या निवडणुका जाहीर झालेल्या राहुरी तालुक्यातील संस्था अशा -

टाकळीमिया सहकारी ग्राहक भांडार , टाकळीमिया , प्रगती फळे भाजीपाला सहकारी संस्था , सात्रळ, ता. राहुरी , अहिल्याबाई होळकर कृषि फळ प्रक्रिया सहकारी संस्था , तमनर आखाडा, प्रेरणा कृषि फळ प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. राहुरी, ता. राहुरी, चंद्रगिरी फळबाग व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था मर्या., मांजरी, ता. राहुरी, संत माऊली ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., लाख, ता. राहुरी, साई व्दारका अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., राहुरी, ता. राहुरी, साई आदर्श को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, साई फ्रूट अर्बन को-ऑप. पतसंस्था, राहुरी, ता. राहुरी, राम कृष्ण हरी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., राहुरी, ता. राहुरी. साईसेवा नागरी सहकारी पतसंस्था , श्रीशिवाजीनगर, ता. राहुरी, अर्थसखी महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., गणेगाव, ता. राहुरी, कणकावती क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., कणगर, ता. राहुरी, विघ्नहर्ता अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., राहुरी, ता. राहुरी, दैवत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., टाकळीमियाँ, ता. राहुरी, धनश्री नागरी सहकारी पतसंस्था मर्या., राहुरी, ता. राहुरी, विरभद्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., चिंचोली, ता. राहुरी, संकल्प नागरी सहकारी पतसंस्था ., श्री शिवाजीनगर, ता. राहुरी, राहुरी तालुका राजमाता जिजाऊ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., राहुरी, ता. राहुरी, महालगांव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., महालगांव, ता. राहुरी .

Post a Comment

0 Comments