बंद पडलेल्या साखर कारखाना निवडणुक प्रचारात झळकले मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स
राहुरी ( प्रतिनिधी )
नगर जिल्ह्यात नेहमीच चर्चेत राहिलेल्या राहुरीतील डॉ. बाबुराव बाबूजी तनपुरे साखर कारखान्याच्या ( बंद पडलेल्या ) संचालक मंडळाची निवडणूक सध्या धामधुमीत सुरू आहे . 31 मे 2025 रोजी मतदान होणार असलेल्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी तिरंगी लढत पहावयास मिळत आहे .
तनपुरे कारखाना बचाव कृती समितीच्या माध्यमातून कृती समितीचे अनेक प्रमुख उमेदवार म्हणून तिसऱ्या पॅनलच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. गेल्या काही वर्षांपासून अनेक कारणांमुळे तनपुरे कारखान्याचे चाक सुरू झालेले नाही . बंद पडलेल्या कारखान्यामुळे अनेकांना राजकारणात देखील अपयश आलेले सर्वांनी पाहिलेले आहे . कोर्टकचेऱ्या , कामगार सभासदांची देणे , कारखान्याच्या अंतर्गत असणाऱ्या जागांची कोर्ट आदेशाद्वारे होणारी विक्री , अशा अनेक चक्रव्यूहात डॉक्टर तनपुरे कारखाना नेहमीच चर्चेत आलेला आहे . असे असताना आता बंद पडलेल्या या साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रचार सुरू आहे .
नगर जिल्ह्यातील नुकताच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या थोरात व विखे साखर कारखान्यांनी बिनविरोध संचालक मंडळाच्या निवडणुका पार पाडल्या आणि आता याच नगर जिल्ह्यातील चर्चेत असलेल्या तनपुरे साखर कारखान्याची निवडणुकीत तिरंगी लढत पाहावयास मिळत आहे .
या निवडणूक प्रचारात कारखाना सुरू करण्यासाठी व वाचवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचे प्रचारांमध्ये नामोल्लेख केले जात असून कारखाना सुरू करण्यासाठी हे नेते प्रयत्न व पुढाकार घेतील अशी आश्वासन दिली जात आहेत . एवढेच नव्हे तर निवडणूक प्रचारामध्ये अनेक ठिकाणी निवडणूक लढविणाऱ्या मंडळाकडून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स ठळक अक्षरात झळकत आहेत. डॉक्टर तनपुरे कारखान्याचे सभासद , मतदार , कामगार व राहुरीकरांमध्ये या नेत्यांच्या फ्लेक्स झळकलेल्या फ्लेक्सची जोरदार चर्चा सुरू आहे . बंद पडलेल्या कारखाना सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न निष्फळ झाले , आता निवडून येणारे संचालक मंडळ यांना राज्याचे नेते मंडळी काय मदत करतील ! याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .



Post a Comment
0 Comments