रॉंग साईड बस चालवणारे चालकास न्यायालयाने ठोठावला दोन हजार रुपये दंड
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत येथे वारंवार ट्राफिक जाम होत असून सदर जामचे मूळ कारण हे बरेचसे वाहन चालक हे थोडेही ट्राफिक जाम असल्यास फुटलेल्या रोड डिव्हायडर मधून रॉंग साईडने गाड्या टाकतात व त्यामुळे तासंतास वाहतुकीचा खोळंबा होतो.
बऱ्याच वेळी एसटी महामंडळाच्या बसेस चे चालक सुद्धा रॉंग साईड गाड्या टाकतात असे निदर्शनात आल्याने दिनांक 11 मे 2025 रोजी राज्य परिवहन महामंडळ बस स्थानक प्रमुख राहुरी व राज्य परिवहन महामंडळ आगार प्रमुख श्रीरामपूर
यांना लेखी पत्र व्यवहार करून सर्व बस चालकांना कोणत्याही परिस्थितीत रॉंग साईड गाडी टाकून वाहतुकीला अडथळा न करण्याबाबत कळवलेले होते.
[ याकडेही गांभीर्याने पहा - ]
( राहुरी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड ट्राफिक त्यातच रस्त्याच्या कडेला गॅस पाईपलाईनच्या कामानंतर झालेले उंचवटे आणि पावसाचे पाणी मल्हारवाडी रस्त्यालगतच्या सर्व भागात साचल्याने अनेक वाहन चालक जोरात गाडी चालवत असल्याने सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे . याकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न विचारला जात आहे . )
तरीसुद्धा आज सुमारे 11.30 चे सुमारास अकलुज डेपोची बस क्र:-MH-14-BT-4224 वरील चालकाने राहुरी कॉलेज ते राहुरी बस स्थानक दरम्यान ट्राफिक जाम झाल्याने रॉंग साईट धोकादायक पद्धतीने गाडी घातली ज्यामुळे अधिकच ट्राफिक जाम झाल्याने सदर बस वर MVA 184 प्रमाणे कारवाई केली. *सदर कारवाई चे अनुषंगाने सदर बस चालक मा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी राहुरी यांचे न्यायालयात आज रोजी हजर राहिला असता मां न्यायालयाने सदर चालकास दोन हजार रुपये दंड केला आहे.*
राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना आव्हान केले की कोणीही रॉंग साईड गाडी टाकून वाहतूक जाम करू नये.
तसेच वाहतूक जाम टाळण्यासाठी अशा प्रकारची कारवाई नियमित राहुरी फॅक्टरी तथा राहुरी शहरात केले जाणार असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली.
सदरची कारवाई पीएसआय आहेर, पोलीस हवालदार संतोष ठोंबरे, पोलीस हवालदार फुलमाळी, सचिन ताजणे यांच्या पथकाने केली.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुवर्मे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात करण्यात आली.



Post a Comment
0 Comments