तनपुरे कारखाना निवडणुकीसाठी आता मतदान होणार या ठिकाणी ; निवडणुकीची प्रशासकीय तयारी पूर्ण
राहुरी ( प्रतिनिधी )
येत्या ३१ मे रोजी होणाऱ्या डॉ तनपुरे साखर कारखाना निवडणुकीसाठी मतदान हे आता एकाच ठिकाणी म्हणजे राहुरी कारखाना येथील छत्रपती माध्यमिक व प्राथमिक विद्यालयात होणार आहे. मतदानासाठी मतदारांना फोटो असलेले शासकीय ओळख पत्र सक्तीचे असून ओळख पत्र असल्याशिवाय मतदान करू दिले जाणार नाही , अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत यांनी पत्रकारांना दिली. प्रशासनाची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
डॉ तनपुरे साखर कारखान्याची निवडनुकीसाठी प्रशासनाने मतदानासाठी राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ व राहुरी कारखाना येथील छत्रपती विद्यालय या दोन ठिकाणी मतदान घेण्याचे ठरवले होते व तसे तुम्ही पॅनलनी आपल्या प्रचारात छापलेल्या पॉम्पलेट वर मतदान वरील दोन्ही ठिकाणी होणार असल्याचे सांगितले होते. पण तिन्ही पॅनलच्या प्रमुखांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्र देऊन निवडणुका एकाच ठिकाणी घ्याव्यात अशी मागणी केल्यावरून आज निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार यांनी चर्चा व पहाणी करून सदर निवडणूक ही राहुरी कारखाना येथील छत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीसाठी २११००मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून ब वर्गासाठी १९० मतदार आहेत. निवडणुकीसाठी २१जागेसाठी ५५ उमेदवार रिंगणात उभे आहे.निवडणुकीसाठी दोन पॅनलचे जनसेवा व शेतकरी विकास मंडळाचे पूर्ण म्हणजे २१ उमेदवार तर कारखाना बचाव कृती समितीचे १३उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत.
निवडणूकी साठी ६ गट असून त्यात कोल्हार देवळाली प्रवरा, टाकळीमिया आरडगाव, वांबोरी, राहुरी हे गट असून यातून १५ उमेदवार निवडणुन द्यायचे आहे तर महिला प्रतिनिधी २, इतर मागासवर्ग १भटक्या जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग १, अनुसूचित जाती जमाती १तर ब वर्ग मतदार संघातून १उमेदवार निवडायचा आहे. ३७ मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. यासाठी २७५ कर्मचारी व २५ अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.मतदान ३१ मे रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत होणार आहे.
मतमोजणी दुसऱ्या दिवशी १ जून रोजी राहुरी येथील लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयाच्या जिमखाना हॉल मध्ये होणार असून मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु होईल. मतमोजणीसाठी ३६ टेबल लावण्यात येणार असून त्यासाठी २५/२५ मतपत्रिकेचे गट्ठे करण्यात येतील त्यासाठी मतमोजणीसाठी १५५ कर्मचारी व २० असे १७५ कर्माचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली.


Post a Comment
0 Comments