डॉ. तनपुरे कारखाना मतदान उत्साहात ; सभासदांचा मोठा प्रतिसाद
राहुरी ( प्रतिनिधी )
डॉ. तनपुरे साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली .
दुपारपर्यंत मोठ्या संख्येने मतदार आपआपल्या स्वतःच्या वाहनातून येत मतदान केंद्रावर रांगांमध्ये उभे राहून मतदान करताना दिसून येत होते .
कारखान्याच्या वेगवेगळ्या गटांच्या मतदान केंद्रात मतदारांमध्ये उत्साह दिसून आला .
तीन वर्षे तनपुरे साखर कारखाना बंद अवस्थेत होता. कारखान्याची मोठ्या प्रमाणात देणे आहेत , त्यामुळे कारखाना सुरू करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले आता संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी मतदान होत आहे .
संचालक मंडळ निवडणुकीस बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळ , युवा नेता राजूभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास मंडळ तर कारखाना बचाव कृती समितीचे पॅनल अशी तिरंगी लढत होत आहे .
दुपारपर्यंत 40 टक्क्यांपर्यंत प्राथमिक मतदान झाल्याचे प्राथमिक माहिती समजली . उद्या राहुरी कॉलेज येथे मतमोजणी होणार असून सर्वांचे लक्ष लागले आहे .



Post a Comment
0 Comments