राहुरीच्या बीडीओ ने घेतली दहा हजारांची लाच ; तोफखाना पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल
राहुरी ( प्रतिनिधी )
दोषारोप पत्राचा अहवाल पाठवायचा होता, तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठविण्याकरिता
गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे याने १० हजार रुपयांची लाच घेतली. या प्रकरणी अहिल्यानगर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने आरोपी मुंडे याला आज दि. २० जून रोजी ताब्यात घेऊन कारवाई केली.
या घटनेतील तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक असून त्यांच्यावर गटविकास अधिकारी राहुरी यांच्या अहवालावरून जिल्हा परिषद अहिल्यानगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर तक्रारदार हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे वरील दोषारोप पत्राचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी पाठवायचा होता. तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठविण्याकरिता गट विकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे याने स्वतः १० हजार रुपये लाचेची मागणी करून स्वतः तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारली. तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून आरोपी गट विकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे, वय ५७ वर्षे, रा. केशव कुंज रोड, श्रीराम चौक, ऐश्वर्या नगरी अहिल्यानगर, याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र येथील पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे- वालावलकर तसेच अहिल्यानगर येथील पोलीस उप अधिक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे, पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक, चालक अरुण शेख आदि पथकाने केली. या कारवाईमुळे शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.


Post a Comment
0 Comments