Type Here to Get Search Results !

पहा... कोयना , उजनी , जायकवाडीचे सध्याचे पाणीसाठे

राज्यातील  धरणांमध्ये सुमारे 31 टक्के उपयुक्त पाणीसाठा-- इंजि.हरिश्चंद्र चकोर 

                        ( संग्रहित फोटो )

अहिल्यानगर  ( विशेष वृत्त ) :--

राज्यात लहान, मध्यम व मोठे  एकूण एकत्रित  सुमारे 2997 इतकी धरणे असून

यावर्षीच्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्या अखेर(15 जुन) या सर्व धरणांमध्ये सुमारे 31 टक्के इतका म्हणजेच 442.36 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला असल्याची माहिती जलसंपत्ती अभ्यासक व जल सिंचन तज्ञ इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या( सन २०२५) जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील धरणांमध्ये निश्चितच चांगला पाणीसाठा झालेला असल्याने व सध्या पडत असलेल्या पावसाने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे .

पुढे बोलताना श्री चकोर यांनी सांगितले की, राज्यात सहा(६) महसुली विभाग असून त्यापैकी

कोकण विभागात एकूण 173 धरणे असून त्यांमध्ये आजमीतीस सुमारे 43.99 टीएमसी म्हणजेच 33.62% इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे . 

नाशिक विभागात 537 इतकी लहान-मोठी धरणे असून त्यामध्ये आजमितीस 65.11 टीएमसी म्हणजेच 31.05% इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे .

 पुणे विभागात एकूण 720 धरणे असून त्यामध्ये आज 149.02 टीएमसी म्हणजेच 27.74% इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

मराठवाडा विभागामध्ये एकूण 920 धरणे असून त्यामध्ये आज सुमारे 78..93 टीएमसी म्हणजेच 30.78% इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे .

अमरावती विभागामध्ये 264 धरणे असून त्यामध्ये 52.58 टीएमसी म्हणजेच 39.36%  आणि नागपूर विभागात 383 धरणे असून या धरणांमध्ये 52.72 टीएमसी म्हणजेच 32.40 टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे .

महत्त्वाचे म्हणजे राज्यातील प्रमुख मोठ्या तीन(3 )धरणांमधील एकूण पाणीसाठा खालील प्रमाणे आहे .                                 

१)उजनी धरण-- 87.40 टी.एम.सी. म्हणजेच 74.54%                २) कोयना धरण--- 22.35 टी.एम.सी.( 21.23%)                ३)जायकवाडी धरण ---48.88 टीएमसी ( 47.58%) इतका पाणीसाठा आहे .                              

तसेच बृहन्मुंबई  महानगरपालिकेकडे असलेल्या पाच(५) धरणांमध्ये सुमारे 2.81 टीएमसी म्हणजेच 16.00% इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे .                                           

 ठाणे महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावी धरणात सुमारे 4.43 टीएमसी म्हणजेच 37=04% इतका पाणीसाठा आहे .                                  

  नवी मुंबईसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मोराबे आणि हेटवणे धरणात एकूण सुमारे 3.97 टीएमसी म्हणजेच सरासरी  32.50% इतका पाणीसाठा उपलब्ध आहे .                      

 कोकण प्रदेशात सर्वात जास्त म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील गडनदी धरण येथे आतापर्यंत सुमारे 790 मिलिमीटर इतका पाऊस नोंदविला गेला आहे .                                        

 संगमनेर तालुक्यातील निमोन- तळेगाव परिसराला काही अंशी संजीवनी असलेल्या भोजापुर धरणामध्ये कालपासून पाण्याची आवक सुरू झाली असून धरणात सुमारे 20दशलक्षघनफूट म्हणजेच 5.54% टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे आपल्याशी असल्याचे देखील इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी सांगितले .

Post a Comment

0 Comments