अहमदनगरचे भूत अजूनही अहिल्यानगर जिल्ह्यातील आधार कार्डवाल्यांच्या मानगुटीवर
अहिल्यानगर ( विशेष प्रतिनिधी )
अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र शाळा महाविद्यालयात प्रवेश विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचे प्रक्रिया सुरू आहे .
प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थी , पालक यांचे आधार कार्ड झेरॉक्स अनिवार्य आहे . ही केवायसी पूर्तता करताना सर्व ठिकाणी अहमदनगर चे नाव अहिल्यानगर झाल्याने
आणि आधार कार्डवर बहुतांश विद्यार्थी पालकांचे अजूनही अहमदनगर नाव असल्याने प्रवेश प्रक्रियेसाठी अडथळा निर्माण होत आहे .
प्राप्त माहितीनुसार , गेल्या दोन महिन्यापासून शासन दरबारी जरी जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असले तरी अद्याप आधार कालच्या सॉफ्टवेअर मध्ये ही दुरुस्ती झालेली नसल्याचे समजते . त्यामुळे यासंबंधी अनेक विद्यार्थी , पालक व संस्था चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही अडचण कळवली आहे . अहिल्यानगरचे उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे नगर जिल्ह्यातील आधार केंद्र यांची जबाबदारी आहे .
( Advt )
मात्र नुकतेच अहिल्यानगरचे उपजिल्हाधिकारी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागेवर दुसरे उपजिल्हाधिकारी बदलून आलेले आहेत .
साधारणतः दोन महिने होत आले तरी अद्यापही या संबंधात कोणतीही कारवाई कार्यवाही न झाल्याने अहिल्यानगर नावाची अडचण विद्यार्थी , पालकांना व संस्थाचालकांना डोकेदुखी ठरत आहे . आधार चे मुख्य केंद्र यूएडीएआय कडून कोणतीही कारवाई झालेली नाही . एवढेच नव्हे तर अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने यु ए डी आय यांना या बदलाची माहिती देणे क्रमप्राप्त आहे , त्यामुळे विद्यार्थी पालकांची डोकेदुखी कायम आहे . त्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये बहुतांश ठिकाणी बाधा येत आहे .
77 नवीन आधार चे किट संच अद्याप नाहीच
अहिल्या नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नगर जिल्ह्यातील 77 नवीन आधार चे किट संच उपलब्ध झालेल्या आहेत . त्यातील काही राहुरी तालुक्यातील असल्याचे समजते . मात्र उपजिल्हाधिकारी यांची बदली झाल्याने नवीन उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत पुढील पाठपुरावा न झाल्याने हे नवीन आधार किट संच वाटप झालेले नाहीत . त्यामुळे सध्या बहुतेक ठिकाणी विद्यार्थी , पालक नागरिकांचे मोठी गैरसोय झालेली आहे .
सध्याचे सरकार हे नागरिकांसाठी गतिमान असल्याचे बोलले जाते , मात्र ही स्थिती पाहता सरकारचा दावा फोल ठरला की काय ? अशी शंका विद्यार्थी , पालक वर्गात होत आहे . अहिल्या नगरला नव्याने जिल्हाधिकारी आलेले आहेत . या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित विद्यार्थ्यांची अडचण दूर व्हावी , अशी अपेक्षा विद्यार्थी पालक व संस्थाचालकांकडून केली जात आहे .





Post a Comment
0 Comments