Type Here to Get Search Results !

जिल्हा पोलीस प्रमुखांची टीम कार्यरत मग राहुरी पोलीस काय करतात ? सर्वांचा सवाल

जिल्हा पोलीस प्रमुखांची टीम कार्यरत मग राहुरी पोलीस काय करतात ? सर्वांचा सवाल 

राहुरी ( प्रतिनिधी )

 नव्याने अहिल्यानगर येथे रुजू झालेले जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई सुरू केल्याचे चित्र आहे. परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या  मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात अवैध व्यवसायवर टीमच्या माध्यमातून जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू आहे .

दोन दिवस राहुरी तालुक्यात अशाच प्रकारची कारवाई झाली आहे . राहुरी शहर व परिसरात परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी त्यांच्या पथकासह ऑन कॅमेरा अवैध मावा गुटखा आदी अवैधरित्या विक्री करणाऱ्या ठिकाणांवर शोध मोहीम राबवली . मात्र यात त्यांच्या पथकाला काही आढळून आले नाही . तसेच राहुरी तालुक्यातील चिंचोली परिसरातील प्रवरा नदी मध्ये अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्या वाळू तस्करांवर देखील कारवाई केली. या कारवाईचे राहुरी तालुक्यासह सर्वत्र स्वागत होत असताना नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

 राहुरी शहर , उपनगर व राहुरी तालुक्यात आठ ते दहा पोलीस बीट कार्यरत आहेत . या सर्व ठिकाणांची जबाबदारी या पोलीस बीट प्रमुख व राहुरीचे पोलीस अधिकाऱ्यांची असते . मग जर ह्या सर्व ठिकाणी जर काही अवैध व्यवसाय होत असतील तर त्यांच्यावर नियंत्रण व कारवाई करण्याची जबाबदारी राहुरी पोलिसांवर असते . 

 असे असताना थेट अहिल्यानगरहून विशेष पोलीस पथक राहुरीत येऊन कारवाई करत असेल तर त्यात राहुरी पोलिसांचे अपयश नाही का ? असा सवाल जागरूक नागरिक करीत आहेत . मुळातच राहुरी पोलिसांचे नेमके काय काम आहे ? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे . 

 जिल्हा पोलीस पथक ऑन कॅमेरा राहुरी शहरासह तालुक्यात कारवाई करत असेल तर ही त्या पोलीस पथकाची स्टंटबाजी तर नाही ना ? शिवाय सदर पथकातील काही अधिकारी, पोलीस कर्मचारी यापूर्वी याच भागात कार्यरत होते ? त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारवाई मागे नेमके काय ? असा सवाल देखील राहुरी तालुक्यातील नागरिकांना प्रश्न पडला आहे .

Post a Comment

0 Comments