Type Here to Get Search Results !

डॉ. तनपुरे चे अध्यक्ष अरुण तनपुरे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील

डॉ. तनपुरे चे अध्यक्ष अरुण तनपुरे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सामील

राहुरी ( प्रतिनिधी )

डॉ. तनपुरे कारखान्याचे विद्यमान चेअरमन अरुण तनपुरे यांनी त्यांचे पुत्र हर्ष तनपुरे यांच्या समवेत मंगळवारी रात्री मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला .

नगर जिल्ह्यात या प्रवेशाने खळबळ उडाली आहे . काल रात्री साडेआठ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी प्रवेश केला . यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे , आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते . राहुरीतील तनपुरे यांचे मोजकेच समर्थक उपस्थित होते .


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तनपुरे यांना राष्ट्रवादीचे उपरणे घालून त्यांचा सत्कार केला . डॉ. तनपुरे कारखान्यावर नुकतेच सभापती अरुण तनपुरे यांच्या गटाचे वर्चस्व प्रस्थापित झालेले आहे . असे असताना राहुरी तालुक्यातील राजकीय समीकरण बदलतील असे संकेत मिळत होते . तनपुरे कारखाना सुरू करण्यासाठी एकमेव अरुण तनपुरे व त्यांचे समर्थक काहीतरी हालचाली करतील अशी देखील चर्चा सुरू होती .

 यापूर्वीही शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे पक्ष बदलणार आहेत अशा वावड्या उठल्या गेल्या होत्या . मात्र या वावड्या पूर्ण होईपर्यंत तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केल्याने अनेक समीकरणे बदलतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत . त्यामुळे तनपुरे कारखाना सुरू होण्यासाठीचे प्रयत्न सफल होतील काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

Post a Comment

0 Comments