Type Here to Get Search Results !

निम्म्याहून अधिक कारकीर्द प्रशासक म्हणून राहिलेले राहुरीचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची अखेर फुलंब्रीला बदली

निम्म्याहून अधिक कारकीर्द प्रशासक म्हणून राहिलेले राहुरीचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांची अखेर फुलंब्रीला बदली


राहुरी ( प्रतिनिधी )

         राहुरीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्वर ठोंबरे यांची अखेर संभाजी नगर जिल्ह्यात फुलंब्री येथे बदली करण्यात आली आहे.

राहुरी येथील अनेक घडामोडींमुळे श्री. ठोंबरे हे  चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

मुख्याधिकारी ठोंबरे हे पहिलेच अधिकारी असावे की ज्यांची सर्वाधिक कारकीर्द ही प्रशासक म्हणून गेली आहे  . राहुरीतील अनेक घडामोडीत त्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग आल्याने ते नेहमीच चर्चेत आले म्हणून त्यांची कारकीर्द ही वादग्रस्त ठरली.
   
         मुख्याधिकारी ठोंबरे यांच्या कालावधीत राहुरी शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली होती . त्याचप्रमाणे राहुरी शहरातील, कोलमडलेली आरोग्यसेवा, मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली होती.
     व त्यातच नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या तालमीत श्री शिवरायांच्या छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने मुख्याधिकाऱ्यांविरोधात सर्वत्र नाराजी पसरली होती. व त्यातच राहुरी नगरपालिकेचा ५० लाखांचा निधी कर्जत नगरपंचायतीकडे वळविला गेला, शहरात सुरू असलेल्या भुयारी गटारीची कामास
  झालेला विलंब अशा अनेक तक्रारी श्री ठोंबरे यांच्या कार्य काळामध्ये झाल्याने त्यांच्या विरोधात
माजीमंत्री प्राजक्त तनपरे यांनी छत्रपतींच्या पुतळा विटंबनेस मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे हेच जबाबदार असल्याचे म्हंटले होते.  राहुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी शहरातील अतिक्रमणे काढताना  दुजाभाव केल्याचे निदर्शनास आले असल्याचे नागरिकांनी आरोप केले होते. त्यामुळे व्यापारी वर्गाने ही मुख्याधिकारी ठोंबरे यांच्या विरोधात मोठा संताप व्यक्त केला होता. मुख्यधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे हे कर्मचाऱ्यांवर सुद्धा काही प्रमाणात समन्वय ठेवू शकले नसल्यामुळे कर्मचाऱ्यां कडून  खंत व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ तनपुरे साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून विरोधकांना चांगलाच धक्का दिला आहे . व त्यातच मुख्याधिकारी ठोंबरे यांची तडकाफडकी बदली झाल्याने नागरिकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे.
       माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्यावर कारवाई करण्याची व त्यांना निलंबित करण्याची मागणी त्यावेळी केली होती.
राहुरीत अनेक उत्तम प्रशासक म्हणून मुख्याधिकारी येऊन पुढे बढती मिळवत उपायुक्त व आयुक्त पदावर देखील पोहोचलेले आहेत.   मात्र क्वचितच मुख्याधिकारी यांची कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे . आता राहुरी शहराची घडी व्यवस्थित करण्यासाठी कोण मुख्याधिकारी येणार याकडे राहुरी शहरवासीयांचे लक्ष लागले आहे .

Post a Comment

0 Comments