Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री साहेब ! राहुरीच्या कृषी विद्यापीठाला कुलगुरू कधी मिळणार ? शेतकऱ्यांचा सवाल

 मुख्यमंत्री साहेब ! राहुरीच्या कृषी विद्यापीठाला कुलगुरू कधी मिळणार ? शेतकऱ्यांचा सवाल

 राहुरी ( विशेष प्रतिनिधी )

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला गेल्या पाच महिन्यांपासून अजूनही कुलगुरू नाही. डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचे निधन झाल्यानंतर हे पद रिक्तच आहे.

नवीन कुलगुरू निवडण्यासाठीची प्रक्रियाच अजून सुरू झालेली नाही. राज्य शासनाला याचे गांभीर्य आहे की नाही ? अशी जोरदारपणे टीका होत आहे .

या पाच महिन्यांच्या काळात विद्यापीठाला दोन प्रभारी कुलगुरू आलेले आहेत .पूर्णवेळ कुलगुरू नसल्यामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर निश्चितच विपरित परिणाम झालेला आहे.


महाराष्ट्रात राज्यपाल हे कृषी विद्यापीठांचे कुलपती असतात तर कृषिमंत्री प्रतिकुलपती असतात. राज्यपालांकडून कुलगुरू शोध समिती स्थापन केली जाते. कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची भूमिका महत्त्वाची असते. राज्यातील चार कृषी विद्यापीठांमध्ये समन्वय राखण्यासाठी व त्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी कृषी परिषदेची स्थापना झालेली आहे. चारही विद्यापीठांतील प्राध्यापक, शास्त्रज्ञांच्या भरतीचे, पदोन्नतीचे अधिकारही कृषी परिषदेकडेच आहेत. कृषिमंत्री हे परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर कृषी शिक्षण, संशोधन या क्षेत्राचा अभ्यास व ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड केली जाते .

  २०१६ मध्ये राज्यातील चारही कृषी विद्यापीठांवर अधिस्वीकृती गमावण्याची नामुष्की ओढवली होती. विद्यापीठात मोठ्या संख्येने रिक्त पदे आहेत. देशातील कृषी विद्यापीठांची २०२४ ची मानांकन यादी केंद्र सरकारने जानेवारीमध्ये जाहीर केली होती. त्यात दर्जेदार व गुणवत्ताप्रधान अशा ४० विद्यापीठांच्या यादीत राज्यातील एकाही कृषी विद्यापीठाला स्थान मिळालेले नाही. उलट गेल्या वर्षीच्या मानांकन यादीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नावही आले नाही. विद्यापीठांमध्ये जवळपास ५० टक्के पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. पदोन्नत्याही रखडल्यामुळे विभागप्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, अधिष्ठाता, संशोधन संचालक व विस्तार शिक्षण संचालक या पदांवर नियमित नियुक्त्याच नाहीत. 

शिक्षण, संशोधन आणि विस्तार हा फक्त नावालाच राहिला की काय ? असे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 10 जिल्ह्यांमध्ये विचारला जात आहे .

एका बाजूला अलीकडच्या काळामध्ये ग्लोबल वार्मिंग , विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात विचित्र हवामान बनले आहे . ऊन वारा पाऊस बदलती पीक पद्धती शेतकऱ्यांसमोरील अन्नधान्य बी बियाणे यांची आव्हाने असताना त्याच कार्यक्षेत्रात जर संशोधनासाठी हालचाली होत नसल्याने बिकट प्रश्न उभा राहत आहे . त्यामुळे कृषी विद्यापीठांची जबाबदारी वाढणे आवश्यक आहे. अशा स्थितीत विद्यापीठ अधिक जबाबदार असताना पाच-पाच महिने कुलुगुरूदेखील निवडला जात नसेल अवघड बाब आहे. राज्यपाल आणि कृषिमंत्र्यांना यांची जबाबदारी आहे.

 म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सुखावला गेला नाही पाहिजे अशा परिस्थितीमध्ये प्रभारी कुलगुरू आणखी किती काळ चालणार ? असा प्रश्न जाणकार करत आहेत .

सध्याच्या राज्य शासन काळात संभ्रमावस्था सुरू असताना या महत्त्वाच्या विषयाकडे कोण लक्ष घालणार असा प्रश्न विचारला जात आहे . राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पूर्ण काळ कुलगुरू कधी मिळणार असा आता खडा सवाल विचारला जात आहे .

Post a Comment

0 Comments