Type Here to Get Search Results !

राहुरी कृषी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या पुण्यातील तरुणीचा अपघातात मृत्यू

राहुरी कृषी विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या पुण्यातील तरुणीचा अपघातात मृत्यू

राहुरी  ( प्रतिनिधी )

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पेट्रोल पंपाजवळ आज शुक्रवारी दुपारी कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या पुण्यातील तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सुचिता आधाटे (वय अंदाजे २८, रा. पुणे) असे तिचे नाव असून, ती कृषी विस्तार विभागात पीएच.डी. तृतीय वर्षाच्या अंतिम सत्रात शिक्षण घेत होती.  

मालवाहतूक ट्रक नगरहून राहुरीच्या दिशेने जात असताना दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सुचिता हि गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच विद्यापीठ सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांच्या नेतृत्वाखाली डी.एन. जाधव, जयेश पवार, अमोल दिवे, गणेश पर्वत, अनिल नजन, रविराज काळे तसेच महिला सुरक्षा रक्षक पूजा पवार आणि वर्षा नेहे यांनी घटनास्थळी धाव घेतली.0

सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी अपघातग्रस्त तरुणाची परिस्थिती पाहता वेळेची तत्परता दाखवत जखमी तरुणीला तातडीने आपल्या शासकीय वाहनातून महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने अहिल्यानगर येथे उपचारासाठी हलविले, मात्र उपचारादरम्यान अपघातग्रस्त तरुणीचा तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments