अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाला मिसाबंदीतील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा पडला विसर !! सन्मान कार्यक्रमाला साध निमंत्रणच नाही
राहुरी ( प्रतिनिधी )
आणीबाणीच्या काळात मिसा कायद्याखाली अटक करण्यात आलेले व १९ महिने नाशिक येथील तुरुंगात अटक असलेल्या व लोकशाहीच्या रक्षणार्थ उभारलेल्या या लढ्यात राहुरी तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सहभाग असतानाही या सत्याग्रहात भाग घेतलेल्या येथील अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना कुठलीही माहिती नव्हती.
या समारंभाचे निमंत्रणच मिळालेले नव्हते , अशी खंत जिल्ह्यातील समाजवादी नेते कै. साथी हौशीनाथ लोहार (पोपळघट ) यांचे सुपुत्र ज्ञानेश्वर पोपळघट यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे राहुरीचे आमदार भाजपचे असतानाही प्रशासनाला याचा विसर पडावा याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आणीबाणी लागू झालेल्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणीबाणीत कारावास भोगलेल्या जिल्ह्यातील संघर्षयात्रींचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला खरा पण राहुरी तालुक्यातील बहुतांशी संघर्षयात्रींचा मात्र प्रशासनाला विसर पडला. विशेष म्हणजे भाजपचा आमदार असलेल्या या तालुक्यातील दुर्लक्षित राहिलेल्या संघर्षयात्रींचा उल्लेख देखील झाला नाही आणि त्यांचा सन्मान देखील झाला नाही.
स्वातंत्र्य सैनिक सन्मानपत्र सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राज्य सरकारने आयोजित केलेल्या सन्मान कार्यक्रमात राहुरी तालुक्यातील विशेष सहभाग असतानाही या सत्याग्रहात भाग घेतलेल्या येथील अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना कुठलीही माहिती नव्हती. व या समारंभाचे निमंत्रणच मिळालेले नव्हते
याबाबतच्या स्वातंत्र्यसैनिकाची यादी जिल्हाधिकारी कार्यालयातून आली होती व त्यानुसार निमंत्रणे देण्यात आली अशी माहिती तालुकास्तरावरून देण्यात आली. मात्र त्याच वेळेस काही मिसाबंदीतील स्वातंत्र्य सैनिकांना मागील वर्षी २५ जूनला २०२४ रोजी झालेल्या सत्कार समारंभात राहुरीत बोलवण्यात आलेले होते. मात्र त्यांना आता नगरच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेले नव्हते.
आणीबाणी बाबत सविस्तर माहिती देताना ज्ञानेश्वर पोपळघट म्हणाले की सन १९७१ मध्ये विरोधी पक्षनेते राजनारायण यांनी रायबरेली मतसंघातून त्यांनी इदिरा गांधी विरुद्ध निवाडणुक हरल्यानंतर इंदिरा गांधी याच्या विरुद्ध निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक गैरप्रकार केल्याचा आरोप केला व तक्रार दाखल केली होती.
१९७१ पाकिस्तान युद्धानंतर देशाची अर्थव्यवस्था डळमलीत झाली त्यानंतर देशभरात जनक्षाप सुरु होऊन त्याचे नेतृत्व जयप्रकाश नारायण यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विरोधी पक्षानी एकत्र येत २२जून १९७५ अनेक विरोधी पक्षाला नेल्यांनी दिल्ली येथील रामलीला मैदानावर मोठ्या सभेचे आयोजन केले होते.यानंतर २५ जुन ९७५ रोजी राष्ट्रपती फक्रूरूद्दीन अली अहमद यांनी इदिरा गांधी यांच्या सल्ल्याने संविधानातील कलम ३५२(१)खाली देशभर आणीबाणी जाहीर केली. हयाद्वारे इंदिरा गांधी यांनी लोकशाही स्थगित करुन देशातील प्रशासकीय अधिकार आपल्या हातात घेऊन त्यांनी जयप्रकाश नारायण,अटल बिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नाडीस यासारख्या मोठ्या नेत्यांना तुरुगांत डांबण्यात आले.
महाराष्ट्रातही आणीबाणी काळात विरोधी पक्षातील नेल्यांना तुरुंगात डांबण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने समाजवादी चळवळीचे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख लोकांचा भरणा होता, मृणालताई गोरे पन्नालाल सुराणा, प्रभुभाई संघवी, गोपीनाथ मुंढे, प्रमोद महाजन, ग प्र प्रधान मास्तर एस, एम. जोशी या प्रमुख नेत्यांना तुरुगांत डांबण्यात आले.
तत्कालीन अहमदनगर जिल्हयातही सरकार विरोधी वातावरण तयार होऊन विरोधी पक्ष आणीबाणीस विरोध करू लागले. यामध्ये प्रामुख्याने साथी हौशीनाथ लोहार, राजाभाऊ झरकर, अविनाश आपटे, मोरोपंत उपाध्ये हे नेते अग्रभागी होते. महाराष्ट्राचे मिनी नागपुर म्हणून ओळखले जाणारे बेलापुर मधील अनेक नेतेही या आंदोलनात सहभागी घेते आणीबाणीला विरोध म्हणून अहमदनगर येथील गांधी मैदानावर मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. या सभेमध्ये भाषण करीत असताना साथी हौशीनाथ लोहार यांना सरकारविरोधी म्हणून अटक करण्यात आली त्यानंतर त्यांची खाजगी नाशिक येथील सेंट्रल जेलमध्ये करण्याम आली. त्यानंतर राहुरी मधील मोरोपंत उपाध्ये, नेवासकर मामा, वसंतसा लक्ष्मणसा पवार यांनाही अटक करण्यात येऊन त्यांनाही नाशिक येथे हलविण्यात आले.असे ज्ञानेश्वर पोपळघट यांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments