Type Here to Get Search Results !

प्रहार दिव्यांग संघटनेचे समन्वयक तथा उत्कृष्ट निवेदक आप्पासाहेब ढोकणे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

प्रहार दिव्यांग संघटनेचे समन्वयक तथा उत्कृष्ट निवेदक आप्पासाहेब ढोकणे यांना "गरुड फाउंडेशन" च्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर



राहुरी  ( प्रतिनिधी )

 प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे यांनी निवेदकीय व दिव्यांग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल गरुड फाउंडेशन च्या वतीने 2025 चा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला.

हा पुरस्कार 7 जून 2025 अण्णासाहेब शिंदे सभागृह महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्यातची बुलंद तोफ कोणत्याही कार्यक्रमात सूत्रसंचालन करून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तसेच दिव्यांग बांधवांना ही न्याय देणारे त्यांचे प्रश्न सोडवणारे म्हणजे आप्पासाहेब ढोकणे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जिल्हा उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख तालुकाध्यक्ष योगेश लबडे महिला तालुकाध्यक्ष सौ.छायाताई हारदे तालुका सचिव दत्तात्रय खेमनर तालुका उपाध्यक्ष माणिक तारडे तालुका समन्वयक तुकाराम बाचकर, तालुका सल्लागार बाबुराव शिंदे सर तालुका संपर्कप्रमुख रवींद्र भुजाडी तालुका संघटक भास्कर दरंदले कोंडवड शाखा अध्यक्ष विजय म्हसे माहेगाव शाखाध्यक्ष भरत आढाव,दवणगाव शाखाध्यक्ष नानासाहेब खपके मानोरी शाखाध्यक्ष सुभाष कोकाटे सर तालुका पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.

Post a Comment

0 Comments