Type Here to Get Search Results !

मुळा धरणाकडे विक्रमी 23 हजार क्युसेकने पाण्याची आवक

मुळा धरणाकडे विक्रमी 23 हजार क्युसेकने पाण्याची आवक

राहुरी ( प्रतिनिधी )

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या तुफान बॅटिंग मुळे धरणाकडे सायंकाळी 23 हजार क्युसेकने पाण्याची विक्रमी आवक सुरू होती .

अकोल्या तालुक्यातील मुळा नदीला मोठा पूर आला आहे . कोतुळकडील मुळा नदी दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र आहे . परिणामी उद्या दिवसभरात मुळा धरण साठ्यात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे . मुळा धरणाकडे धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने अर्धा टीएमसी पाण्याची वाढ झाली होती.


त्यानंतर 18 जून पासून पाणलोटात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. 19 जून ला धरणाकडे 4.55 मीटरला 21 हजार 376 क्युसेकने पाण्याची आवक झाली होती , यंदाची ही आवक विक्रमी होती .

 आज शनिवारी सायंकाळी 4.70 मीटरला धरणाकडे तब्बल 23 हजार क्युसेकने आवक सुरू होती . सायंकाळी मुळाधरण साठा 19 हजार 816 दशलक्ष घनफूट (75 टक्के) चावर पोहोचला होता . 

पाण्याची पातळी 1 हजार 800 .40 फूट इतकी झाली होती .

 गेल्या 36 दिवसात मुळा धरणात तब्बल 11 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे . सध्या उजवा कालव्यातून एक हजार शंभर तर डाव्या कालव्यातून 150 क्युसेकने ने आवर्तन सुरू आहे . मुळा धरणाकडे पाण्याची आवक वाढल्याने पुन्हा एकदा धरणातून पाण्याचा विसर्ग होणार काय ! याबाबत शेतकऱ्यांसह लाभक्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे . यंदा मुळा धरण ओव्हरफ्लो होण्याचे आत्ताच संकेत मिळत आहे .

Post a Comment

0 Comments