Type Here to Get Search Results !

सुरत-सोलापूर-चेन्नई एक्सप्रेस हायवे- आता बी.ओ.टी. ची भोकाडी : नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांत व्यक्त होतोय संताप

सुरत-सोलापूर-चेन्नई एक्सप्रेस हायवे- आता बी.ओ.टी. ची भोकाडी : नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांत व्यक्त होतोय संताप

राहुरी  - प्रसाद मैड 

( संपादक  - सतर्क खबरबात जिल्ह्याची )



                     ( संग्रहित फोटो )

नगर जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेले सुरत -सोलापूर-चेन्नई एक्सप्रेस हायवेचे भूत काही केल्या मानगुटीहून उतरेना असे चित्र दिसत असून या रखडलेल्या महत्त्वकांक्षी एक्सप्रेस हायवेचे काम आता

 


बीओटी तत्त्वावर देण्याचा निर्णय झाल्याने एन एच ए आय च्या निर्णयावर नगर जिल्ह्यातील शेतकरी प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे .


( हाच तो पूर्ण झालेला एक्सप्रेस हायवेचा टप्पा सोर्स Google )

           गेल्या अनेक वर्षांपासून देशभरात महत्त्वकांक्षी समजल्या जाणाऱ्या सुरत- सोलापूर चेन्नई या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवेच्या कामाची घोषणा होत अच्छे दिन येतील असे केंद्र सरकारकडून सांगितले जात होते . यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला होता .


( हाच तो पूर्ण झालेला एक्सप्रेस हायवेलाचा टप्पा सोर्स Google )

विशेषतः हा मार्ग नाशिक, नगर, सोलापूर जिल्ह्यातून जाणार असल्याने बागायत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या गेल्या .

 या महामार्गाचे काम भूसंपादनामुळे व अन्य काम कारणांमुळे रखडले आहे . गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गावरील या एक्सप्रेस मार्ग मधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर एन एच ए आय चा बोजा चढलेल्या असल्याने शेतकऱ्यांची अनेक कामे देखील रखडली आहेत .

राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरण या एक्सप्रेस हायवेचे काम हायब्रीड एनयूटी मॉडेल मधून करणार होते , ते देखील केंद्राच्या भारतमाला योजनेअंतर्गत . मात्र याच कोठेतरी घोडे अडल्याने आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत कामे होणार असल्याने या सुरत सोलापूर चेन्नई एक्सप्रेस हायवेचे काम बांधा वापरा व हस्तार्थीत करा हस्तांतरित करा म्हणजेच बीओटी तत्त्वावर केले जाणार आहे . एन एच ए आय च्या या निर्णयावर नगर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .

सुरत- सोलापूर -चेन्नई या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवेच्या सुरत ते नाशिक , नाशिक ते सोलापूर आणि सोलापूर ते चेन्नई या अनेक टप्प्यांमध्ये महत्त्वाचा टप्पा हा नाशिक ते अहिल्यानगर हा 152 किलोमीटरचा असून नगर ते अक्कलकोट हा 222 किलोमीटरचा टप्पा असणार आहे . एकूण या 374 किलोमीटर कामाला केंद्रीय अर्थमंत्राला मंत्रालयाने मंजुरी दिली असून आता या मंजुरीचा चेंडू केंद्रीय मंत्रिमंडळाकडे गेला आहे . त्यामुळे या हायवेचे काम बीओटी तत्त्वावर होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे . त्यामुळे नगर जिल्ह्यातील संगमनेर , राहुरी , नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व रोष व्यक्त केला आहे . या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .


Post a Comment

0 Comments