Type Here to Get Search Results !

राहुरीतील 83 ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत जाहीर ; 43 ठिकाणी महिलाराज

राहुरीतील 83 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर ; 43 ठिकाणी महिलाराज

 राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी तालुक्यातील 83 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आज आरक्षण सोडत प्रक्रिया राहुरीत करण्यात आली .


 एकूण 83 पैकी 43 ठिकाणी सरपंच पदासाठी महिलाराज असेल , मात्र चाळीस ठिकाणी विविध प्रवर्गात व्यक्ती साठी आरक्षण असल्याने काय होणार ! हे महत्त्वाचे ठरणार आहे .

 राहुरी तालुक्यातील एकूण 83 ग्रामपंचायतींसाठी आज राहुरीत सरपंच पदाची आरक्षण सोडत शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली .


यात अनुसूचित जाती जाती व्यक्ती साठी पाच , अनुसूचित जाती महिला सहा अनुसूचित जमाती व्यक्ती (7) , अनुसूचित जमाती महिला (8) , नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती (11) , नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (11), सर्वसाधारण महिला (18) , सर्वसाधारण व्यक्ती (11) असे एकूण 83 ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली .

 यामध्ये प्रामुख्याने सोनगाव (अनुसूचित जाती व्यक्ती) , कोल्हार खुर्द (अनुसूचित जमाती व्यक्ती) , सात्रळ (अनुसूचित जमाती महिला) , राहुरी खुर्द (अनुसूचित जमाती व्यक्ती) ,उंबरे (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) , वांबोरी (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) , टाकळीमिया (सर्वसाधारण व्यक्ती) , मांजरी (सर्वसाधारण व्यक्ती) , ब्राह्मणी (सर्वसाधारण व्यक्ती) तर बारागाव नांदूर (सर्वसाधारण महिला) अशा मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली. आपापल्या गावात सरपंच पदाचे काय आरक्षण असेल याची सर्वच ग्रामपंचायत भागात उत्सुकता लागून राहिली होती .

Post a Comment

0 Comments