राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा : राज्यात चर्चा सुरू
सतर्क खबरबात जिल्ह्याची [ विशेष वृत्त ]
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिल्याचे मुंबईहून वृत्त असून येथे मंगळवारी नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे नियुक्ती होण्याची शक्यता आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष , राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्या या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा दोन टर्म पूर्ण झालेल्या असून तिसऱ्या टर्ममध्ये देखील त्यांची कामगिरी ही खूप महत्त्वाची आणि निर्णायक ठरलेली आहे.
आमदार शशिकांत शिंदे ( संभाव्य नूतन प्रदेशाध्यक्ष )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईत येत्या मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक होईल त्यात नूतन प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय घेण्यात येईल , अशी सूत्रांनी माहिती दिली आहे . राहुरीचे माजी आमदार , माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते राहुरी बाजार समिती सभापती व डॉक्टर तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे यांनी नुकतेच मुंबईत अजित पवार यांच्या पक्षात पदाधिकाऱ्यांसह प्रवेश केला . याची चर्चा राहुरीसह नगर जिल्ह्यात झाली. माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंकडे च्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते . त्यानंतर या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व सर्वत्र याचीच चर्चा सुरू आहे .राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे



Post a Comment
0 Comments