राहुरीत भर बाजारपेठेत सराफ दुकान फोडले : शहरात खळबळ
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी शहरातील प्रसिद्ध राजेंद्र भनसाळी यांचे वर्धमान ज्वेलर्स हे सराफी दुकान रविवारी मध्यरात्री चोरटय़ांनी फोडले . सराफ दुकानातून लाखो रुपयांचा चांदीचा माल चोरट्यांनी चोरून नेला .
शहरातील भर पेठेत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे .याबाबत मिळालेली माहिती अशी , राहुरी येथील प्रसिद्ध सराफ राजेंद्र भन्साळी यांचे विद्यामंदिर रस्त्यावर भर पेठेत वर्धमान ज्वेलर्स सराफ दुकान आहे.
आज सकाळी दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले . आजूबाजूच्या नागरिकांनी ही बाब भनसाळी यांना कळवले . भनसाळी यांनी सराफ दुकानात आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले .
राहुरी चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सराफ दुकान बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारला , त्यानंतर पद्धतशीरपणे दुकानाच्या शटर चे कुलूप न तोडता कोंडा तोडले व आत प्रवेश केला. आतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे काउंटर फोडून चोरट्यांनी दाग दागिन्यांचा माल लंपास केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
लाखो रुपयाची चांदी चोरीला गेल्याचे संशय व्यक्त करण्यात येत आहे . सोने चोरल्यावर चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील नेला .
वर्धमान ज्वेलर्सचे संचालक राजेंद्र भन्साळी त्यांचे पुत्र गौरव भन्साळी व सौरभ भन्साळी यांनी दुकानातील चोरीला गेलेला मालाची पाहणी केली. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांसह मोठ्या संख्येने सराफ व्यवसायिकांनी घटनास्थळी धाव घेतली . राहुरी शहरातील भर पेठेत सराफ दुकान फोडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राहुरी चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत .


Post a Comment
0 Comments