मुळा धरणातून जायकवाडीकडे झेपावले तीन हजार क्युसेकने पाणी
राहुरी ( प्रतिनिधी )
नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणातून यंदा जुलै च्या सुरुवातीलाच पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आज दुपारी धरण परिचलन सूचीनुसार धरण साठा ७० % पर्यंत पोहोचल्या नंतर धरणातून ३०००क्यूसेसने सर्व ११ दरवाज्यातून मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले.
जुलै महिन्यात मुळाचे पाणी जायकवाडीकडे झेपावले मे महिन्यातच यंदा मुळा धरणात अर्धा टीएमसी पाणी अवकाळी पावसाने जमा झाले होते जून मधील पावसाने विक्रमी कामगिरी केल्याने धरण साठ्यात ,झपाट्याने वाढ होत राहिली यंदा पावसाचे अंदाज सर्वत्र बांधले जात होते जून महिन्यात व जुलै च्या सुरुवातीला पावसाने सर्वत्र दमदार बॅटिंग केली.तसेच बॅटिंग
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाली जून अखेर निम्मी भरत आले पावसाचा जोर कायम राहिल्याने धरण परिचलन सूचीनुसार धरण साठा १८१५० दशलक्ष घनफूट होताच आज दुपारनंतर जलसंपदा विभागाच्या मुळाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते कळ दाबून धरणाच्या सर्व ११ दरवाजांमधून एकूण ३०००मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले यावेळी मुळा धरणाचे उपविभागीय अभियंता व्ही.डी. पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे तसेच लाभधारक शेतकरी उपस्थित होते.धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यापूर्वी इशाऱ्याचा भोंगाही वाजवण्यात आला.
यावेळी कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मुळा धरणाच्या लाभक्षेत धरण क्षेत्रात यंदा चांगला पाऊस होत असून धरण परिचलन सूचीनुसार १५ जुलै पर्यंत १८१५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा कायम ठेवून येणारी पाण्याची अतिरिक्त आवक नदीपात्रात सोडण्यात येत आहे १५ जुलै नंतर ३० जुलै पर्यंत धरण परिचलन सूचीनुसार धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येईल. धरणातून जायकवाडी इकडे पाणी झेपावल्याने मुळा लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
(सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाचा एकूण पाणी साठा १८१६२ दलघफु इतके असून धरणात कोतुळ येथून ५३२७क्यूसेसने सुरु आहे.)
फोटो

Post a Comment
0 Comments