Type Here to Get Search Results !

राहुरी तालुक्यातील ताहाराबाद यात्रेत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद ; पाच दिवस पोलीस कस्टडी

राहुरी तालुक्यातील ताहाराबाद यात्रेत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद ; पाच दिवस पोलीस कस्टडी

राहुरी ( प्रतिनिधी )


राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक  21 जुलै पासून 24 जुलै 2025 पर्यंत श्रेष्ठ संत महिपती महाराज यांची यात्रा सुरू होती . सदर यात्रेदरम्यान भाविकांना दरोडा टाकून लुबाडण्याच्या उद्देशाने काही महिलांची व पुरुषांची टोळी यात्रेत आलेली आहे ,

अशी गोपनीय माहिती दि.  23 जुलै रोजी दुपारच्या सुमारास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली होती .



सदर माहितीच्या अनुषंगाने शासकीय पंचांसह छापा कारवाई केली असता श्रीरामपूर तालुक्यातील तीन तर , नेवासा तालुक्यातील दोन महिलांसह श्रीरामपूर येथील असलम अकबर शेख , वय 39 वर्ष यांना ताब्यात घेतले . हे दरोडाच्या पूर्वतयारीने मिळून आल्याने त्यांच्यावर भारतीयांनी संहिता कलम ३१० अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना मा. न्यायालयाकडे हजर ठेवून त्यांची पोलीस कस्टडीची मागणी केली असता सरकारी अभियंता श्री गागरे यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडल्याने पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली .
सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे , अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे , उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे  यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे , पोलिस हवलदार विकास साळवे, विजय नवले ,जानकीराम खेमनर ,अशोक झिने,गणेश मैड , अंकुश भोसले ,नदीम शेख , इफ्तिकार सय्यद, महिला पोलीस वंदना पवार ,मीना नाचन श्रीरामपूर आरसीबी पथक चे हवालदार सुनील वाघचौरे व आरसीपी पथक यांनी केली . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे व इफ्तेकार सय्यद करत आहेत .

Post a Comment

0 Comments