राहुरी येथील वर्धमान ज्वेलर्स चोरीचा गुन्हा उघड ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त , दोघांना पोलीस कोठडी
आरोपींकडून 4,95,269 रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त
आरोपीची प्रथम पाच दिवस पोलीस कस्टडी व आज परत चार दिवस पोलीस कस्टडी
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 14/07/2025 रोजी फिर्यादी यांचे वर्धमान ज्वेलर्स राहुरी येथे अज्ञात चोरट्याने एकूण 60,45,000 /- रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरी गेल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्यांमध्ये आरोपी बाबत कोणताही पुरावा नसताना आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून आरोपींनी दाखल गुन्ह्या सारखा यवत पोलीस स्टेशन जिल्हा पुणे येथे केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून राहुरी पोलीस स्टेशन येथील पथक तपासकामी दाखल झाले. त्यावरून राहुरी पोलीस स्टेशन येथील तपास पथक, यवत पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा पुणे येथील पोलीस पथक असे संयुक्त पथकाने दोन्हीही गुन्ह्यांचा समांतर तपास करून सदरचे गुन्हे आरोपी नामे 1) विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी राहणार पुणे 2)अतुल सुरेश खंडागळे राहणार पुणे व त्यांचे इतर चार साथीदारांनी केले असल्याचे तपासणी निष्पन्न झाले. आरोपी विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या जिल्ह्यातील पोलीस स्टेशन येथे सुमारे 90 गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे लोणीकंद जिल्हा पुणे येथे असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने संयुक्त पोलीस पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींना प्रथम यवत पोलीस स्टेशन दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली त्यानंतर राहुरी येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे. आरोपींना दिनांक 25/07/2025 रोजी माननीय न्यायालयात हजर करून पोलिस कस्टडी रिमांड मिळण्याबाबत अहवाल सादर केला असता मा.न्यायालयाने दिनांक 30/07/2025 रोजी पावतो आरोपींना पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. पोलीस कस्टडी रिमांड करता माननीय सरकारी अभियोग्यता श्री. P.K. पाटील राहुरी न्यायालय यांनी कामकाज पाहिले आहे. पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये आरोपी विकी सिंग जालिंदर सिंग कल्याणी याने गुन्ह्यामध्ये चोरी केलेल्या माला पैकी एकूण 4,95,269/- रुपये किमतीचा सोन्याच्या मुद्देमाल तपासा दरम्यान काढून दिल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींना आज रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयाने दिनांक 2/8/2025 रोजी पावतो पोलीस कस्टडी रिमांड वाढवून दिलेली आहे .पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे व विकास साळवे करत आहे .
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे साहेब, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे साहेब ,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बसवराज शिवपुजे साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे पोलिस हवलदार सुरज गायकवाड, राहुल यादव, विकास साळवे,प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, सतीश कुऱ्हाडे, नदीम शेख, सचिन ताजने व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सचिन धनात, दरेकर यांच्या पथकाने केली आहे.


Post a Comment
0 Comments