Type Here to Get Search Results !

मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावणार ...पण

 मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावणार .....पण

राहुरी ( प्रतिनिधी )

मुळा धरणातून नदीपात्रात जायकवाडीकडे येत्या दोन-तीन दिवसात पाणी पातळी

नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे चित्र आहे .


जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात धरणातून पाणी सोडण्याचा हा एक वेगळा विक्रम असेल !


 यंदाच्या वर्षी मुळा धरणासह सर्वत्र पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसाच्या कामगिरीमुळे धरणांमधील पाणीसाठ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत काही धरणे ओव्हरफ्लो होत आहेत .


 मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात अर्धा टीएमसी नव्याने पाणी जमा झाले . जूनमध्ये सव्वा तीन टीएमसी पाणी जमा होत दहा फुटांनी पाणी पातळी वाढली . जुलै च्या पहिल्या आठवड्यातच धरणात तब्बल साडेचार टीएमसी पाण्याची आवक होत 12 फूट पाणी जमा होत धरणसाठा सोमवारी सात जुलैला 17 टी एम सी वर पोहोचला .

धरण परिचरण सूची आर ओ एस नुसार अप्पर गाईड कर्व नुसार 15 जुलै पर्यंत 18 हजार 161 ( 69.13% ) पाणीसाठा झाल्यावर अतिरिक्त पाणी धरणातून मुळा नदीपात्रात सोडण्याचे निर्देश आहेत . त्यामुळे आता फक्त दोन फूट पाणी जमा होणे आहे .

आज सोमवार सात जुलै सायंकाळी धरण साठा १७ टीएमसी वर पोहोचला तर पाण्याची आवक सातत्याने वाढलेली आहे . सायंकाळी दहा हजार 342 क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती . परिणामी उद्या सायंकाळपर्यंत धरण साठा 18 टीएमसी पार करण्याची शक्यता आहे . जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 18 हजार 200 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाल्यानंतर मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात येईल .

Post a Comment

0 Comments