Type Here to Get Search Results !

पोलीस अधिकाऱ्यांसह "त्या" पोलिसांचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते झाला सन्मान

पोलीस अधिकाऱ्यांसह  "त्या"  पोलिसांचा विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या हस्ते झाला सन्मान

राहुरी  ( प्रतिनिधी )

                मा.दत्तात्रय कराळे ( विशेष पोलीस  महानिरीक्षक ) नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या हस्ते बनावट नोटांचे रॅकेट उघड करणारे राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचा सन्मान करण्यात आला .


         यावेळी  समवेत सोमनाथ घार्गे ( पोलीस अधीक्षक , अहिल्यानगर )  ,  राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , गुन्हे शोध पथक पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे , पोलीस अंमलदार  विकास साळवे , सुरज गायकवाड , राहुल यादव , अंकुश भोसले , नदीम शेख , प्रमोद ढाकणे , सतीश कुराडे , इत्यादींचा सन्मान करण्यात आला .



घटना अशी आहे....

राहुरी पोलिस पथकाने 27 जून रोजी शहर हद्दीत धडाकेबाज कारवाई केली. दोन लाख रुपयांच्या २०० व ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तीन आरोपींना पोलिस पथकाने सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  अहिल्यानगर येथून तीन इसम बनावट नोटा घेऊन मोटरसायकलवर राहुरीकडे येत आहेत अशी गुप्त खबर राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना २८ जून रोजी रात्री मिळाली. तेव्हा संजय ठेंगे यांनी ताबडतोब एक पोलिस पथक बरोबर घेऊन राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर गाडगे महाराज आश्रम शाळा परिसरात सापळा लावला.  काही वेळाने तेथे  मोटरसायकलवर तिन इसम आले. तेव्हा पोलिस पथकाने त्यांना जागेवरच झडप घालून पकडले. पथकाने त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या जवळ २ लाख रुपयांच्या २०० व ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. ॲक्सीस बँक राहुरी शाखेचे मॅनेजर कैलास वाणी यांनी घटनास्थळी सदर नोटा बनावट असल्याची खात्री केली. त्यानंतर पथकाने मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाआड केले. 

         हवालदार सुरज गायकवाड यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे हे करीत आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस उप निरीक्षक संदिप मुरकुटे, राजू जाधव, हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढोकणे, नदिम शेख, सतिष कुऱ्हाडे, अंकुश भोसले, चालक शकुर सय्यद आदि पोलिस पथकाने केली.

Post a Comment

0 Comments