राज्यातील धरणांमध्ये 31 ऑगष्ट अखेर सुमारे 84.82% इतका उपयुक्त पाणीसाठा - इंजि.हरिश्चंद्र चकोर
अहिल्यानगर ( प्रतिनिधी ) -
राज्यात लहान, मध्यम व मोठे एकूण एकत्रित सुमारे 2997 इतकी धरणे असून यावर्षीच्या 30 ऑगष्ट 2025 अखेर या सर्व धरणांमध्ये सुमारे 84.82%टक्के (1214.27 टी.एम.सी. )इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला असल्याची माहिती जलसंपत्ती अभ्यासक व जल सिंचन तज्ञ इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
त्याचबरोबर गतवर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमधील पाणीसाठा हा 77.33%(1107.04 टीएमसी) इतकाच होता मात्र यावर्षी सुमारे 7.50% टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा जास्त आहे .
यावर्षीच्या( सन २०२५) 07 मे ते31ऑगष्ट पर्यंत पडलेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये उत्तम पाणीसाठा झालेला असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे .
सद्यस्थितीत गेल्या तीन- चार दिवसापासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा, विदर्भ जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून या विभागांतील बहुतेक धरणे तुडुंब भरली असून धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सोडण्यात येत आहे त्यामुळे पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली पाहावयास मिळत आहे . अजूनही जवळपास एक महिना पावसाळ्याचा कालावधी बाकी आहे .
पुढे बोलताना श्री चकोर यांनी सांगितले की, राज्यात सहा(६) महसुली विभाग असून 31 ऑगस्ट 2025 अखेर धरणांमधील उपयुक्त पाणी साठ्या ची स्थिती खालील प्रमाणे आहे .
♦️ कोकण विभागात एकूण 173 धरणे असून त्यांमध्ये आजमीतीस सुमारे 111.115 टी.एम.सी.( 92.21%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे .
♦️नाशिक विभागात 537 इतकी लहान,मध्यम व मोठी धरणे असून त्यामध्ये आजमितीस 162.195 , टीएमसी (77.70%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे .
♦️नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 25 धरणांमधील उपयुक्त पाण्यासाठ्याची टक्केवारी सुमारे 96 टक्के इतकी असून ती गतवर्षीपेक्षा 4% टक्क्यांनी जास्त असल्याने नाशिककरांची पाण्याची चिंता जवळपास मिटली आहे .
आजमितीस भोजापुर* *धरणात सुमारे 87 टक्के (350 द.ल.घ.फुट ) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे .
♦️पुणे विभागात एकूण 720 धरणे असून त्यामध्ये आज 488.256 टीएमसी (90.91%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
♦️मराठवाडा विभागामध्ये एकूण 920 धरणे असून त्यामध्ये आज सुमारे 207.962 टीएमसी (81.10)% इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे .गेल्या 15 दिवसात मराठवाडा पडलेल्या प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे धरण साठ्यांत सुमारे टीएमसी(17% )इतकी पाणी वाढ झाली आहे .
♦️अमरावती विभागामध्ये 264 धरणे असून त्यामध्ये 120.648 टीएमसी (83.21%) आणि नागपूर विभागात 383 धरणे असून या धरणांमध्ये 123.392 टीएमसी ( 75.24%) टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे .
♦️सर्वात जास्त पाणीसाठा कोकण विभागात (92.21%) आणि त्या खालोखाल पुणे विभागात ( 90.91%) असून सर्वात कमी पाणीसाठा नागपूर विभागात (75.24%) असल्याचे दिसून येत आहे .
राज्यातील प्रमुख मोठ्या सात(10)धरणांमधील एकूण एकत्रित पाणीसाठा खालील प्रमाणे आहे .
१) उजनी धरण -120.16 टी.एम.सी. ( 102.47% ) २) कोयना --101.36 टी.एम.सी.( 96.29%) . ३) जायकवाडी --101.93 टी.एम.सी. ( 99.22%)
४) गिरणा धरण--16.90 टी.एम.सी.(91.39%)
५) गोसीखुर्द --12.560 टीएमसी (48.07%)
६) पेंच प्रकल्प --30.29 टीएमसी (84.35%)
७) भातसा धरण --33.21 टीएमसी (99.83%)
८)मुळशी --19.54 टीएमसी (96.61%)
९)भाटघर --23.50 टीएमसी (100%)
१०)ईसापुर(पेनगंगा)-32.90 टीएमसी (96.64%)
११) वारणा::::26.05 टीएमसी (94.55%)
१३) राधानगरी:::7.69 टीएमसी (98.99%)
१४) उर्ध्व वर्धा::::18.46 टीएमसी (92.67%)
१५) अलमट्टी::::::104.17 टीएमसी (98.77%)
इतका एकूण पाणीसाठा झालेला आहे .
तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे असलेल्या पाच(5) धरणांमध्ये सुमारे 17.43 टी.एम.सी.( 98.09%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
ठाणे महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावी धरणात सुमारे 11.91 टीएमसी( 99.53% )इतका पाणीसाठा आहे .
नवी मुंबईसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मोराबे आणि हेटवणे धरणात एकूण सुमारे 11.53 टी.एम.सी. म्हणजेच सरासरी (99%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे .
♦️ या पावसाळ्यामध्ये आज पर्यंत सर्वात जास्त पाऊस म्हणजे घाट माथ्यावर मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात
मुळशी --6531 मिमी, घाटघर --4553 मिमी, महाबळेश्वर--5006 मिमी लोणावळा-4635 मिमी नातुवाडी(कोकण)--4202 मिमी . इतका एकूण पाऊस चालू पावसाळ्यामध्ये आत्तापर्यंत नोंदविला गेला आहे .
♦️विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामध्ये आजमितीस राज्यातील सर्वात कमी म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातील लोणी येथे फक्त 143 मिमी इतक्या पाऊसाची नोंद झालेली आहे .
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या भंडारदरा धरणात सुमारे 11.039 टीएमसी (100%)*,*निळवंडे धरणात 8.32 टीएमसी(100%)* *मुळा धरणात 25.62 टीएमसी (98.54%), आढळा धरण-1.060 टीएमसी (100%) इतका एकूण पाणीसाठा झालेला आहे .
महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणारया पश्चिमघाट माथ्यावरील "घाटघर "येथे आत्तापर्यंत सुमारे 4553 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये जवळपास सर्वच महसूल विभागामधील धरणांमध्ये अत्यंत समाधानकारक पाणीसाठा झाल्याने व अजूनही पावसाळा शिल्लक असल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निश्चितच मिटला असुन शेती सिंचनासाठी देखील मोठा दिलासा व फायदा मिळणार आहे . तसेच जायकवाडी धरणामध्ये सुमारे 101.93 टीएमसी(99.22)% इतका एकूण पाणीसाठा झाल्याने धरण पूर्ण संचय पातळी नियमन सूचीनुसार (ROS) जायकवाडी धरणा मधून सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे . आतापर्यंत जायकवाडी धरणात यावर्षीचा एक जून 2025 पासून पावसाळ्यामध्ये एकूण 84.32 टीएमसी इतकी पाणी आवक झाली असून आतपर्यंत सांडव्यावरुन गोदावरी नदी पात्रात सुमारे 24.66 टीएमसी पाणी सोडण्यात आलेले आहे.
*जायकवाडी धरण पहिल्यांदाच जुलै अखेर जवळपास 95 टक्के इतके भरल्याने व गेल्या पंधरवड्यामध्ये गोदावरी नदी पात्रात पाणी सोडण्यात आलेले होते . त्याचबरोबर गेल्या१५ दिवसांपासून मराठवाड्यात पडणाऱ्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मराठवाड्यातील बहुतेक धरणे पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने येलदरी, माजलगाव ,ईसापुर (पेनगंगा), विष्णुपुरी, दुधना ,मांजरा, तेरणा, सिध्देश्वर ,सीनाकोळेगाव या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे.
.*तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या अलमट्टी धरणामध्ये 104.18 टीएमसी (99%) पाणीसाठा असून या धरणा मधून सुमारे 89,967 क्युसेक्स इतका पाणी विसर्ग सोडण्यात येत आहे*
आता मराठवाडा विभागात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत असले तरी बहुतेक ठिकाणी विशेषतः नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पर्जन्यवृष्टी झाल्याने उभ्या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे . त्यामुळे शासनाकडून तातडीने भरपाई मिळावी अशी आग्रही मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली असल्याची माहिती इंजि. हरिश्चंद्र र चकोर यांनी दिली .




Post a Comment
0 Comments