मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राहुरीत राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी रोखला
राहुरी ( प्रतिनिधी )
मुंबई सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज राहुरी
सकल मराठा समाजाच्या वतीने नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आला .
यावेळी एकमुखाने समाजाच्या वतीने शासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी करण्यात आली . मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर मुंबईत आमरण उपोषण सुरू केले आहे . आज पाचव्या दिवशी राहुरीत जरांगे पाटलांना समर्थनार्थ राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments