लाखो आंदोलनकर्त्यांची शासनाने दखल घ्यावी : राहुरीत सकल मराठा समाजाच्या वतीने मागणी व पाठिंबा - मोठा प्रतिसाद
राहुरी ( प्रतिनिधी )
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबई येथे उपस्थित आहे. त्या ठिकाणी उपस्थित आंदोलनकर्त्यांची गैरसोय होऊ नये, याची प्रशासन दखल घ्यावी. तसेच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राहुरी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने महसूल व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवार दि. २९ ऑगस्ट २०२५ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसलेले आहे. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव दाखल होत शांततेच्या मार्गाने पाठिंबा देत आहे. मुंबई येथे पाऊस चालू आहे. मराठा बांधवांचे हाल व्हावे व आंदोलन मोडीत निघावे, या उद्देशाने सरकारने आझाद मैदान परिसरातील व्यावसायिकांचे दुकाने बंद केली आहेत. सबंधित दुकाने बंद केल्यामुळे येणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पाणी, नाष्टा, छत्री यासह लागणाऱ्या दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करता येत नाहीत.
त्याच बरोबर सरकारने पाणी पिण्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना आझाद मैदान मुंबईच्या दिशेने येणारे रस्ते जाणीवपूर्वक बंद केले आहे. आंदोलन स्थळापासून १० ते १५ किमी लांब आंदोलनांचे वाहने अडविल्यामुळे ऐन पावसाळ्यात मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल होत आहे. राज्य सरकारने जाणीवपूर्वक चालविलेले मराठा आंदोलनांचे हाल थांबवावे. महाराष्ट्र सरकारने सबंधित विषयात दखल न घेतल्यास मराठा समाजाकडून प्रत्येक गाव खेड्यात कुठलीही पूर्व कल्पना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतेवेळी युवा मंच चे अध्यक्ष कांता तनपुरे, शरद तनपुरे, गणेश नेहे, अक्षय तनपुरे, रेवन्नाथ धसाळ, संभाजी मोरे, संदीप गागरे, कृष्णा तनपुरे, मनोज म्हस्के, मदन तनपुरे, विक्रम मोढे, मयूर काल्हापुरे, सचिन बोरुडे, राहुलकाका तनपुरे, राजेंद्र लबडे, विनायक बाठे, कुलदीप नवले, विनायक बाठे, नामदेव वांडेकर, अशोक तनपुरे, अविनाश तनपुरे, श्रीकांत डावखर, श्याम तनपुरे, विक्रम मोढे, रवींद्र तनपुरे, अनिल शिरसाट, अक्षय शिंदे, अमोल तनपुरे, शुभम तोडमल, युवराज तोडमल, ऋषी कलापुरे, युवराज तोडमल, पप्पू तनपुरे, संग्राम तनपुरे, प्रवीण राऊत, मधुकर घाडगे, राजेंद्र खोजे तसेच राहुरी तालुका बार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष ॲड. प्रशांत मुसमाडे, उपाध्यक्ष ॲड. बाळासाहेब बाचकर, सचिव ॲड. ज्ञानेश्वर येवले, ॲड. योगेश शिंदे, ॲड. राहुलभैय्या शेटे यांच्या वतीने पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments