शिक्षिकेने स्वामी विवेकानंद यांचे पुस्तक देत केले विद्यार्थ्यांचे स्वागत
राहुरी फॅक्टरी ( प्रतिनिधी )
राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील शिक्षिका संगिता गणेश भांड- गायकवाड यांनी इयता ११ वीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांचे भेट देऊन स्वागत केले आहे.
११ वी कला व शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण सुरू होऊन विद्यार्थ्यांनी आजपासून महाविद्यालयात प्रवेश केला असता विद्यालयाच्या प्रा.संगीता गणेश भांड- गायकवाड यांच्या वतीने विद्यार्थ्यांना आचार-विचारात बदल व्हावा या हेतूने स्वामी विवेकानंदांची बोधवचने हे पुस्तके भेट देऊन त्यांचे महाविद्यालयात स्वागत केले.
यावेळी संस्थेचे प्राचार्य उत्तम खुळे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अनोख्या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.



Post a Comment
0 Comments