राहुरीतील या महसूल सेवकाचा झाला नगरमध्ये गौरव
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी येथील महसूल सेवक राधेश्याम मेहरे यांचा नुकताच उत्तम व कार्यक्षम शासन प्रतिनिधी म्हणून
जबाबदारी पार पाडल्यानिमित्त अहिल्यानगर येथे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते हे सन्मान चिन्ह देऊन नुकतेच गौरविण्यात आले . राहुरी गावचे महसूल सेवक म्हणून राधेश्याम धनसिंग मेहरे हे गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत . एक ऑगस्ट 2024 ते 31 जुलै 2025 या महसूल वर्षात उत्तम व कार्यक्षम शासन प्रतिनिधी म्हणून विविध उद्दिष्टपूर्ती व जबाबदाऱ्या पार पाडण्यात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री राधेश्याम मेहरे यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान देऊन गौरविण्यात आले .
यावेळी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया , अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे , शिर्डी चे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब कोळेकर , उपविभागीय अधिकारी श्री कुमार चिंचकर आदी वरिष्ठ अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते . महसूल सेवक राधेश्याम मेहरे यांचा नगर येथे गौरव झाल्याने राहुरी त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .


Post a Comment
0 Comments