Type Here to Get Search Results !

आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी खेळली फुगडी

आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी खेळली फुगडी

अहिल्यानगर ( प्रतिनिधी )

राज्यभर प्रसिद्ध असलेल्या सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या हरिनाम सप्ताहात सप्ताहाच्या सांगता सोहोळ्यात

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांसह हजेरी लावली .

अहिल्यानगर मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे आराध्यस्थान असणाऱ्या सद्गुरु गंगागिरी महाराज यांचा 178 वा अखंड हरिनाम सप्ताह 


सोहळा वैजापूर अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर आयोजित करण्यात आला होता . 




सप्ताहाच्या सांगता समारोह प्रसंगी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांसह हजेरी लावली . 


         या सप्ताहाला गावा गावातून भाकरी व अन्य साहित्याचा

ओघ सुरू होता .


 सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर अहिल्यानगर सीमेवर गेल्या आठ दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली . 


आज बुधवार सहा ऑगस्ट रोजी सप्ताहाच्या सांगता समारोहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली . त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , गिरीश महाजन प्रसिद्ध मीडिया कर्मि तथा सुदर्शन न्युज चैनल चे मुख्य संपादक सुरेश जी चव्हाणके तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते . यावेळी सप्ताहाच्या सांगता समारोहात राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूजनीय रामगिरी महाराज यांच्या संगे फुगडी खेळण्याचा अनुभव घेतला . यावेळी अन्य मान्यवरांनाही मान्यवरांनीही सोहळ्याच्या व्यासपीठावर फुगडी खेळली मोठ्या थाटामाटात गंगागिरी महाराज सप्ताह सोहळा संपन्न झाला .

Post a Comment

0 Comments