रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर :
नगर जिल्ह्यातूनही धावणार वंदे भारत एक्सप्रेस
अहिल्यानगर ( प्रतिनिधी )
अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसह हौशी व भाविकांसाठी खुशखबर आहे ! नागपूर ते पुणे व पुणे ते नागपूर वंदे भारत एक्सप्रेस ची सेवा लगेचच रेल्वे मंत्रालयाकडून सुरू होत आहे .
या निर्णयाने रेल्वे प्रवाशांचं साईभक्त शनि भक्त नगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे .
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा योजनेंतर्गत रेल्वे मंत्रालयाच्या मध्य रेल्वेने नागपूर ते पुणे व्हाया मनमाड नगर दौंड अशी रेल्वे सेवा सुरू होत आहे.
सोमवार वगळता दररोज नागपूरहून सकाळी नऊ पन्नास ला वंदे भारत एक्सप्रेस अजनी वर्धा बडनेरा अकोला भुसावळ जळगाव मार्गे मनमाड येथे येऊन कोपरगाव नगर दौंड मार्गे पुणे येथे रात्री पोहोचेल तर पुणे येथून मंगळवार व्यतिरिक्त हीच वंदे भारत एक्सप्रेस नागपूरला गाडी नंबर 26 102 जाणार आहे .
रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्याने सुरू होत असल्याने भाविकांना दिलासा मिळेल. मात्र या गाडीला राहुरीचाही थांबा मिळावा , अशी मागणी अनेक क्षणी व साई भक्तांनी केली आहे .



Post a Comment
0 Comments