Type Here to Get Search Results !

आरएसएस च्या शाखेत प्रार्थना सुरू असतानाच सर्पराजाचे दर्शन ; व्हिडिओ व्हायरल

आर.एस.एस. च्या शाखेत प्रार्थना सुरू असतानाच सर्पराजाचे दर्शन ; व्हिडिओ व्हायरल

अहिल्यानगर ( विशेष वृत्त )

      राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाकडे सध्या वाटचाल करीत आहे ,

त्यामुळे संघाच्या संदर्भात कोणतीही माहिती सध्या बातमीचा विषय देखील होऊ शकतो असे चित्र आहे .

 सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे . त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका शाखेत पाऊस सुरू असताना  एका सर्पाने प्रवेश केल्याचे दिसते. 


( हा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे : सोर्स सोशल मीडिया )

               संघाच्या शाखेची प्रार्थना सुरू असताना हा साप दोन-तीन स्वयंसेवकांच्या बाजूने कोणालाही इजा न करता जात असल्याचे चित्र अर्थात व्हिडिओ दिसत आहे .

       प्रार्थना झाल्यानंतर या सर्पाला संबंधित स्वयंसेवकांनी नैसर्गिक अधिवासात सोडले . संबंधित व्हिडिओ महाराष्ट्रातील लोणावळा परिसरात असल्याचे नमूद केल्याने या व्हिडिओची चर्चा सुरू आहे .

           राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सध्या संघ शताब्दी म्हणजेच 100 वर्षाकडे पदार्पण करीत आहे . संघाची शिस्त व संघ शाखा आणि शाखा विस्तार हा जगजाहीर झाला आहे . संघावर जितकी स्तुती सुमने उधळतात तितकीच संघावर टीका देखील केली जाते . देशभरात व जगभरात संघाच्या 60 हजार हून अधिक दैनंदिन शाखा , तीस हजाराहून अधिक साप्ताहिक मिलन , महिन्यातून एकदा होणारे संघ मंडळी असा वटवृक्ष झाला आहे . सध्या संघाचे विविध उपक्रम सुरू झाले आहेत .

       संघ शाखेत प्रार्थनेच्या वेळी शिस्त पाळली जाते आणि प्रार्थना सुरू असताना स्वयंसेवकाच्या शेजारून सर्प राजाने कोणालाही इजा न करता आपले दर्शन घडविले या व्हिडिओची जोरदारपणे चर्चा सुरू आहे .

Post a Comment

0 Comments