Type Here to Get Search Results !

गुन्ह्यांचा तपास उघडकीस आणणाऱ्या पोलिसांचा स्नेहालय कडून सत्कार

 लैंगिक अत्याचारापासून मुलींची सुटका करून सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान खुनाचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या राहुरी पोलिस पथकाचा स्नेहालयाकडून सत्कार



राहुरी ( प्रतिनिधी )

 चार अल्पवयीन पीडीतांवर लैंगिक अत्याचार करून तीन पीडित मुलींना डांबून ठेवल्या बाबतची माहिती स्नेहालयाच्या पूजा दहातोंडे यांच्याकडून


 


राहुरी पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ मा. पोलीस अधीक्षक



श्री सोमनाथ घार्गे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब



यांच्या मार्गदर्शनाने पोउपनी. राजू जाधव, पोहेकॉ. सुरज गायकवाड, राहुल यादव, शकूर सय्यद, पोकॉ. गणेश लिपणे, प्रमोद ढाकणे, अंकुश भोसले, नदीम शेख, मपोकॉ. वंदना पवार, मीना नाचन यांचे पथक नेमून सदर माहितीची शहानिशा करणे कामी दवणगाव



तालुका राहुरी येथे गेले असता सदर ठिकाणी तीन अल्पवयीन पीडीता मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून



राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपासात सदर गुन्ह्याचे तपासात आरोपी बजरंग कारभारी साळुंके, शितल बजरंग साळुंके दोघे राहणार दवणगाव यांना अटक करण्यात आली होती अटकेदरम्यान गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर याच्याबाबत आरोपीकडे तपास करतात त्याचा आरोपी बजरंग कारभारी साळुंके व त्याच्या पत्नीने खून करून त्याचे प्रेत करून ठेवल्याचे उघड झाले. पोलीस पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उडान प्रकल्प संचलित स्नेहालय अहिल्यानगर येथील श्री. हनीफ शेख, अँड.बागेश्री जरंडीकर मानक,श्री. प्रवीण शाम कदम, श्री. शाहिद शेख, कु. पूजा संभाजी दहातोंडे, श्री. विनायक महाले यांनी राहुरी पोलीस स्टेशन च्या पोलिस पथकाचा व सौ. प्रयागाताई लोंढे ( सरपंच शेंडी ), शारदा ब्राह्मणे, आशा आढाव ( अंगणवाडी सेविका शेंडी ) यांचा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जयदत्त भवर साहेब यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान केला.

Post a Comment

0 Comments