Type Here to Get Search Results !

घरपट्टी- पाणीपट्टीची शास्ती 50% माफ होणार ; या माजीमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : नागरिकांमध्ये दिलासा

घरपट्टी- पाणीपट्टीची शास्ती 50% माफ होणार ; या माजीमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : नागरिकांमध्ये दिलासा

राहुरी ( प्रतिनिधी )

नगरपालिका हद्दीतील नागरिकांच्या घरपट्टी पाणीपट्टीची शास्ती आता 50 टक्के माप होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राहुरी नगरपालिका हद्दीतील मालमत्ता धारक नागरिकांच्या मालमत्त करावर वर जी २ टक्के शास्ती लावण्यात आली होती



त्याविरोधात नगरपालिकेच्या सत्तेवर असताना माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली थकीत माल मत्तेवर लावण्यात आलेली शास्ती पूर्णपणे माफ करावी अशी मागणी केली होती.


त्याबाबत शासनाने सदर शास्ती १००टक्के ऐवजी ५० करण्याचा निर्णया बाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांनी राहुरी पालिकेस २ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांनी मंजुरी पत्र दिल्यावरच केवळ निवडणूक डोळ्या समोर ठेऊन झोपलेल्या विरोधकांनी जागे होऊन पालिकेने शास्ती माफ न केल्यास पालिकेस कुलूप ठोकण्याची भाषा करीत असल्याची टिका माजी नगराध्यक्ष अनिल कासार व गजानन सातभाई यांनी केली.
राहुरी नगरपालिकेच्या तत्कालीन पदाधिकारी यांनी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना राहुरी नगरपालिकेने २०२१ साली १०० टक्के शास्ती माफीचा ठराव करून तो ठराव नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे कडे या पदाची जबाबदारी असताना दिला होता.त्याच काळात त्यांनी या प्रश्नावर त्यांचे प्रयत्न सुरु असतानाच सरकार बदल्याने त्यास दिरंगाई झाल्याने या निर्णयास उशीर झाला माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलेल्या प्रयत्नामुळेच त्याचा लाभ राज्यातील नगरपालिका महानगर पालिकाना झाल्याचे माजी नगराध्यक्ष अनिल कासार व गजानन सातभाई यांनी सांगितले.
वास्तविक आज जे विरोधक ज्या पक्षात आहे त्या पक्षाची सत्ता त्यांचे आमदारांची ताकद असताना ते आजपर्यँत एकदाही विधानसभेत वा जिल्हाधिकारी यांना पत्र देऊ शकले नाही. ते आज जिल्हाधिकारीनी राहुरी पालिकेच्या हद्दीतील नागरिकांच्या थकीत मालमत्ताकराच्या थकीत रक्कमेवर जी शास्ती लावली होती ती ५०टक्के केल्याचे जे पत्र पालिकेस प्राप्त झाल्याची गुणगुण कानावर येताच या प्रश्नाचे श्रेय घेण्यासाठी देखावा केला असल्याचा टोला अनिल कासार व गजानन सातभाई यांनी दिला.
माजी नगराध्यक्षा डॉ सौ उषाताई तनपुरे,दशरथ पोपळघट, शहाजी जाधव, नंदकुमार तनपुरे, अशोक आहेर, दिलीप चौधरी,सोनाली बर्डे,सूर्यकांत भुजाडी, विजय करपे, प्रकाश भुजाडी, विलास तनपुरे, बाळासाहेब उंडे, संजय साळवे व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments