Type Here to Get Search Results !

रास्तारोको आंदोलनातील आंदोलकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल

रास्ता रोको आंदोलनातील आंदोलकांवर राहुरी पोलिसात गुन्हा दाखल



राहुरी  ( विशेष वृत्त )

नगर-मनमाड रस्त्यावर अनेकांचे बळी जात असून या रस्त्याचे काम तातडीने होऊन अवजड वाहतूक वळवावी या मागणीसाठी नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने काल राहुरी फॅक्टरी येथे रास्ता रोको आंदोलन केले.

या आंदोलनातील ९ आंदोलकांवर राहुरी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 याबाबत राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हंटले की, १० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी पुतळ्यासमोर नगर-मनमाड जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० या ठिकाणी वसंत कुंडलीक कदम , अनिल रामभाऊ येवले,प्रशांत शिवाजी मुसमाडे, प्रशांत रामभाऊ काळे,संदिप बाबुराव कोठुळे , गोविंद खावडे , सुनिल पंडीतराव विश्वासराव, आदिनाथ रभाजी कराळे , बाळासाहेब लोखंडे यांनी समाज उदिष्ठासाठी बेकायदेशीर जमाव जमविला, व जमावात सामिल होवुन रस्त्यावर थांबुन राहुन रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे वाहन अजाधिकाराने गैरपणे निरुध्द केले तसेच सार्वजनिक उपद्रव करुन रस्त्याने जाणारे-येणारे दोन्ही बाजुचे वाहने थांबवुन ठेवुन गैरपणे निरुध्द केले तसेच जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये दि. २७ ऑगस्ट २०२५ ते १० सप्टेंबर या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम २७(१००३) वे प्रतिबंधात्मक आदेशांचा भंग केला म्हणून वसंत कुंडलीक कदम , अनिल रामभाऊ येवले,प्रशांत शिवाजी मुसमाडे, प्रशांत रामभाऊ काळे,संदिप बाबुराव कोठुळे , गोविंद खावडे , सुनिल पंडीतराव विश्वासराव आदिनाथ रभाजी कराळे , बाळासाहेब लोखंडे आदी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शेळके करीत आहे.


माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांची सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया -




नगर- मनमाड रस्त्याचा प्रश्न हा अत्यंत जीवन मरणाचा बनला असताना सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेऊन नगर-मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी लढा देत असून त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल केल्याने नागरीकांनी संताप केला आहे. कालच्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे वाहन अडवून त्यांना जाण्यासाठी मज्जाव केला.पर्यायाने त्यांना दुसऱ्या मार्गाने शिर्डीकडे जावे लागले. यामुळे की काय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूत्रे हलवत आंदोलकांवर गुन्हे दाखल केले की काय अशीही चर्चा सुरू आहे.

Post a Comment

0 Comments