Type Here to Get Search Results !

या रविवारी रात्री खगोल प्रेमींना आहे सुवर्णसंधी

 या रविवारी रात्री खगोल प्रेमींना आहे सुवर्णसंधी

 राहुरी ( प्रतिनिधी )

तमाम भाविक आणि विशेषतः खगोल प्रेमींसाठी खास पर्वणी !! मित्रांनो , येत्या रविवारी सर्वांना रात्री आकाशात खगोल चंद्रग्रहण पाहण्याची संधी आहे .

७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री चंद्रग्रहण आहे . उगवत्या वेळेनुसार आकाशात जिथे जिथे चंद्र दिसतो तिथे भारतीय वेळेनुसार ७ सप्टेंबर रोजी रात्री ९.५७ ते १.२७ मिनिटांपर्यंत पूर्ण चंद्रग्रहण पाहता येईल.

भारतात ७ सप्टेंबर रोजी रात्री ९.५७ वाजता चंद्रग्रहण सुरू होईल आणि रात्री ११.४१ वाजता ग्रहणाच्या मध्यभागी असलेली संपूर्ण प्रतिमा पृथ्वीच्या सावलीने झाकली जाईल (पूर्ण ग्रहण) . हे ग्रहण पहाटे १:२७ वाजता संपेल. हे ग्रहण ९.५७ ते १.२७ पर्यंत साडेतीन तास चालेल .

वेदशास्त्रसंपन्न दिनेश अनंतराव औटी (गुरु) राहुरी , जिल्हा - अहिल्यानगर यांनी दिलेली माहिती --



        अहिल्या नगर जिल्ह्यात या ग्रहणाचे वेध दुपारी बारा वाजून 37 मिनिटांनी लागेल . मध्यरात्री ग्रहण साडेतीन तास चालेल . या काळात भाविकांनी कोणत्याही तीर्थक्षेत्रात किंवा नदीत स्नान करावे .  पुढील चंद्रग्रहण मंगळवार 3 मार्च 2026 रोजी रोजी होणार आहे.

Post a Comment

0 Comments