राहुरीकरांनी पुन्हा एकदा रोखला नगर मनमाड रस्ता
राहुरी - विशेष वृत्त
आज सकाळी नगर मनमाड रस्त्यावर खड्ड्यामुळे शशिकांत दुधाडे या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा बळी गेला. आज सकाळी संतप्त नागरिकांनी शवविच्छेदन गृहाजवळ राहुरी मुळा नदी पुला जवळचा रस्ता रोखला. संतप्त नागरिकांच्या भावना या तीव्र स्वरूपात दिसून येत असून ठोस कारवाई होईपर्यंत शशिकांत दुधाडे यांच्या मृतदेहाचे शव विच्छेदन होऊ देणार नाही , अशी भूमिका या संतप्त नागरिकांनी घेतलेली आहे . मुळा नदी पोळा नजीक रस्त्यावर माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक यांनी रस्ता रोखला आहे. पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे

Post a Comment
0 Comments