Type Here to Get Search Results !

पोलीस अधिकारी अन पोलीस दादा चक्क पांढर्‍या टोपीसह गणवेषात रस्त्यावर.. निमित्त पहा....!!

पोलीस अधिकारी अन पोलीस दादा चक्क पांढर्‍या टोपीसह गणवेषात रस्त्यावर.. निमित्त पहा....!!

राहुरी ( प्रतिनिधी )

         नेहमीच वर्दीत दिसणारे पोलीस अधिकारी व पोलीस दादा आज चक्क पांढऱ्याशुभ्र विषात दिसून आले ! 

( सतर्क खबरबात जिल्ह्याची - युट्युब चॅनेलची 60 हजार दर्शक संख्येकडे यशस्वी वाटचाल !! )

( आजच युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा... )

त्याचे कारण असे , गणेशोत्सव काळात उत्साहाची काही औरच


गंमत असते. गणरायाच्या आगमनापासून विसर्जन मिरवणूक पर्यंत सर्वांचाच आनंदाला पारावार उरत नाही .

गणेश उत्सव निमित्त राहुरी पोलिसांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाची आज भव्य मिरवणूक टाळ मृदुंगाच्या तालावर राहुरी शहरातून काढण्यात आली .


गणेश उत्सव निमित्त राहुरी पोलिसांनी प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाची आज भव्य मिरवणूक टाळ मृदुंगाच्या तालावर राहुरी शहरातून काढण्यात आली .

 एक प्रकारे डीजे मुक्त संकल्पना असा संदेश या मिरवणुकीतून राहुरी पोलिसांनी शहरवासीयांना दिला . गणेशोत्सवानिमित्त राहुरी पोलीस स्टेशन शेजारी दत्त मंदिर परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . दुपारी राहुरी शहरातून संगीताचार्य गोपीनाथ वर्पे यांच्या संगीत विद्यालयाच्या बाल विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणुकीत सहभाग नोंदवला .

 यावेळी चक्क पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह उपस्थित सर्व पोलीस दादांनी पांढरा शुभ्र वेश परिधान केला होता . राहुरी शहरात या मिरवणुकीचे आकर्षण बनले होते . डीजे मुक्त मिरवणूक कशी असावी याचे हे मूर्तीमंत उदाहरण असल्याचे शहरवासीयांकडून व्यक्त केले जात आहे .

Post a Comment

0 Comments