Type Here to Get Search Results !

राहुरीत नाथ प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रास दांडिया महोत्सव जल्लोषात सुरू

राहुरीत नाथ प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रास दांडिया महोत्सव जल्लोषात सुरू



राहुरी  ( प्रतिनिधी )

राहुरी शहरातील अग्रगण्य सामाजिक संस्था नाथ प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रास दांडिया महोत्सव शुक्रवार, २६ सप्टेंबर पासून


 

जल्लोषात सुरू झाला असून, ३० सप्टेंबर पर्यंत दररोज रंगतदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात मुलींसाठी सायंकाळी ७ ते ८.३० आणि महिलांसाठी रात्री ८.३० ते ११ या वेळेत गरबा-दांडियाचा उत्सव साजरा करण्यात येतो.



नाथ प्रतिष्ठानचे संस्थापक आणि युवा नेते सौरभ उंडे यांनी शहरातील सर्व महिलांना आणि तरुणींना आवाहन केले की, “हा दांडिया महोत्सव कोणत्याही वर्ग, जात, धर्माच्या सीमा न मानता सर्वांसाठी खुला असून, प्रत्येक स्त्रीने त्याचा मनमुराद आनंद घ्यावा.”


सध्याच्या नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडिया नृत्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे कार्यक्रम विशिष्ट उच्चभ्रू गटापुरतेच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. याच्या पार्श्वभूमीवर, राहुरीतील सर्व समाजघटकांतील महिलांना एकत्र आणून सामाजिक समता आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा उपक्रम नाथ प्रतिष्ठान गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने राबवत आहे.


या उपक्रमामुळे महिलांमध्ये एकता, आनंद, संस्कृतीचा अभिमान आणि सार्वजनिक सहभाग वाढीस लागला आहे. महिलांनी या महोत्सवात रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख घालून गरबा-दांडियाचा जल्लोष करत सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडवले.


राहुरी शहरात अशा प्रकारचा सर्वसमावेशक दांडिया महोत्सव ही एक उदात्त सांस्कृतिक चळवळ ठरत असून, भविष्यात या महोत्सवाचा आवाका वाढवण्याचा निर्धार नाथ प्रतिष्ठानने व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments