सरसकट पंचनामे करून सातबारा कोरा कोरा करा - सुरेशराव लांबे पाटील
राहुरी ( प्रतिनिधी )
संपूर्ण महाराष्ट्रासह राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राहुरी करंजी तिसगाव या भागात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कापूस सोयाबीन कांदा व इतर पिका सह जनावराची चारा पिके वाया गेली .
गेली अनेक वर्षापासून शेतकरी वर्ग कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटामुळे अडचणीत आला आहे चालू वर्षी खरीप हंगामातील मशागती वेळी मे महिन्यातच पाऊस झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या लेट झाल्या व त्यानंतर जून जुलै महिन्यात अल्प पावसामुळे पिके सुकू लागली त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टी या कारणामुळे कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणात पातेगळ होऊन बोंडे सडून गेली आहे,व पिके नामशेष झालेले आहेत. अजूनही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्यामुळे शेतकऱ्यांवर अधिक संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही,निसर्गाच्या या अनियमितपणामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे शासनाने निवडणुकीआधी जाहीर केल्याप्रमाणे वरील ज्वलंत मागणीचा विचार करून सातबारा कोरा कोरा करावा.अन्यथा आम्हाला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करावे लागेल अशी सूचक मागणी व इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी निवेदनात दिला.
पुढे निवेदनात लांबे पाटील यांनी म्हटले शेती मशागतीसाठी लागणारे डिझेल पेट्रोल व रासायनिक खते,कृषी औषधे व शेतीसाठी लागणारी मंजुरीच्या खर्चात भरमसाठ वाढ झाली असून त्या तुलनेत शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गावर उपासमारी सह आत्महत्येची वेळ आलेली आहे, सध्या कांदा सोयाबीन यांच्या भावात तर मोठी घट झाली असल्या कारणाने महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी त्वरित करून सातबारा कोरा करावा व कर्नाटक सरकारच्या धर्तीवर सरसकट पंचनामे करून किमान एकरी 50 हजार रुपये मदत देऊन शेतकरी वर्गाला नवीन कर्ज पुरवठा करून न्याय द्यावा अशी मागणी श्रीरामपूर विभागाचे प्रांत अधिकारी किरण पाटील व राहुरीच्या तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री.उपमुख्यमंत्री कृषी मंत्री.महसूल मंत्री पालकमंत्री. राहुरीचे आमदार.जिल्हाधिकारी अहिल्यानगर.उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर. पोलीस निरीक्षक राहुरी यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे उप जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस साहेब,लहानु भाऊ तमनर.नितीन म्हसे.विकास लांबे.अर्जुन बाचकर. विजय गरदरे. वामनभाऊ.म्हसे पाटील रामभाऊ पटारे यांनी केली,


Post a Comment
0 Comments