शिर्डी -राहुरी -नगर राष्ट्रीय महामार्गावर राहुरीतील अपघातात तिसरा बळी या महामार्गाचा पा..पी हाल .. कट हरा.. म ..खोर ठेकेदार कोण ? याचा खुलासा शासना व N.H.A.I. ने करावा
राहुरी - गंभीर वृत्त ( प्रसाद मैड कडून ) - मोबाईल नंबर 8380091497
नगर मनमाड महामार्गावर लागोपाठ दोन दिवसात तीन अपघात झाले. आज सायंकाळी साडेसात वाजता राहुरी खुर्द येथे मोटार सायकलला कंटेनर ने धडक दिल्याने
झालेल्या अपघातात सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश दत्तू साबळे (वय 68 ) हे जागीच ठार झाले
तर राहुरीच्या कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. रामनाथ डोके सुदैवाने बचावले.
( विश्वासार्ह माहिती अन बातमी ... )
( युट्युब ला सबस्क्राईब करा... )
सायंकाळी फिरायला गेलेले हे दोघेजण मोटरसायकल वरून घरी परतत होते .नगर मनमाड रस्ता दुचाकी वर क्रॉस करताना कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने साबळे व प्रा.डोके दोघेही रस्त्यावर पडले. मात्र दोघे दोन विरुद्ध दिशांना रस्त्यावर पडले . साबळे यांच्या अंगावरून कंटेनरचे मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नगर मनमाड महामार्गावर गेल्या दोन दिवसात तीन अपघात झाले असून तीन बळी पडले आहेत .
नगर मनमाड महामार्गावरील रस्ता अत्यंत धोकादायक आणि प्रचंड खड्ड्यांमुळे वाहतुकीस असुरक्षित झालेला आहे. सामाजिक माध्यमे याविरुद्ध सातत्याने आवाज उठवत आहेत .मात्र यंत्रणा कोणतीही दखल घ्यायला तयार नाही. कालच ज्ञानदेव बलमे या एमआयडीसी त जाताना युवकाचा अपघातात मृत्यू झाला तर गुहा येथे झालेल्या अपघातात अकोले येथील एकाचा मृत्यू झाला. तर आज सायंकाळी साडेसात वाजता हा अपघात घडला.प्रा. डोके जखमी असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.




Post a Comment
0 Comments