खाजगी सावकारांवर कारवाई ऐवजी त्यांचाच पोलीस स्टेशनमध्ये मानसन्मान - या माजीमंत्र्यांनी केली खंत व्यक्त
प्रेरणा पतसंस्थेच्या ब्राह्मणी शाखेचे थाटात शुभारंभ
राहुरी ( प्रतिनिधी )
प्रेरणा पतसंस्थेचा माध्यमातून राज्यात नव्हे तर देशात विश्वास संपादन केल्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून होणारे व्यवहार हे पारदर्शक असल्यामुळे ठेवीदारांना व कर्जदारांना न्याय देण्याचे काम केले जात असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे .
ब्राम्हणी येथे प्रेरणा पतसंस्थेच्या आठव्या शाखेचा शुभारंभ माजीमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ हापसे होते.
यावेळी विविध मान्यवरांचा प्रेरणा पतसंस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर उपस्थित होते .
यावेळी माजीमंत्री तनपुरे बोलताना म्हणाले की , प्रेरणा पतसंस्थेच्या नियमबद्ध व शिस्तबद्ध कामकाजामुळेच लोकांचा विश्वास या संस्थेवर टिकून आहे 'संस्थेतून घेतलेल्या छोट्या कर्जावर थोडा उशीर झाल्याने दंड भरावा लागला होता. मात्र यामुळे मला खात्री पटली की नियम सर्वासाठी सारखे आहेत. त्यामुळे आपले पैसे येथे नक्की सुरक्षित राहतात .
यांनी खाजगी सावकारीच्या प्रश्नावर तीव्र भाष्य केले. 'आज राहुरी तालुक्यात खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे. त्यांच्या व्याजाचे आकडे ऐकले की कान बधिर होतात. अनेक तरुणांचे संसार उद्धस्त होताना दिसतात. दुर्दैवाने या सावकारांवर कडक कारवाई होण्याऐवजी कधी-कधी पोलिस ठाण्यातच त्यांना मान-सन्मान मिळतो. त्यामुळे या गैरव्यवस्थेला पायबंद बसला पाहिजे,' अशी भावना तनपुरेंनी व्यक्त केली. पुढे बोलताना तनपुरे म्हणाले की, प्रेरणा पतसंसंस्थेची 1993 साली एका छोट्या रोपट्यासारखी सुरुवात झालेली ही संस्था आज वटवृक्षाप्रमाणे विस्तारली आहे. ठेवीदारांचा विश्वास संपादन करून संस्थेने आपल्या कामकाजात पारदर्शकता ठेवली आहे. त्यामुळेच परिसरातील शेतकरी, व्यापारी, लघुउद्योग आणि सर्वसामान्य कुटुंबीय यांच्यासाठी प्रेरणा पतसंस्था हा मोठा आधार ठरत आहे.
आगामी काळात २०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट साध्य करण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. "पुढील वर्षी या शाखेतून २०० कोटी ठेवींचा टप्पा गाठला जाईल आणि त्याचा थेट फायदा शेतकरी, व्यावसायिक व ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना होईल," असा विश्वास व्यक्त करण्यात आला. शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह कारभार कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रेरणा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेशशेठ वाबळे असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष सुरेशशेठ वाबळे म्हणाले की , पतसंस्थांच्या विश्वातील अडचणींवर प्रकाश टाकत अनाधिकृत संस्था कशा प्रकारे फसवणूक करतात, तसेच व्याजाच्या अमिषामुळे ठेवीदार कसे फसतात, याची वास्तववादी मांडणी केली.की माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी सतत पतसंस्था सुरू करावी अशी मागणी केली 4 मार्च 1993 सालापासून प्रेरणा पतसंस्थेचे निर्मिती केली आणि आता या पतसंस्थेच्या माध्यमातून आठव्या शाखेचे उद्घाटन करत असून देवळाली प्रवरा शाखेचा उद्घाटन लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले . ते बोलताना पुढे म्हणाले की , पतसंस्था सुरू होऊन 32 वर्षे पूर्ण झाले आहे . खरं तर पतसंस्थेवर सर्वसामान्य जनतेने टाकलेला विश्वास या विश्वासाला आम्ही सार्थक ठरत आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये पतसंस्थेचे माध्यमातून ठेवीवर व्याज हे मर्यादितच देता येते जास्त व्याज देण्याच्या नावाखाली अनेक पतसंस्थेकडून लोकांची लूट झालेली आहे अनेकांचे पैसे बुडाले आहेत . त्यामुळे प्रत्येक ठेवीदाराने पतसंस्था कोण चालवतो , त्या पतसंस्थेचे कार्य काय , त्या पतसंस्थेचे ऑडीट वर्ग काय , याची सगळी तपासणी करून पैसे ठेवणे गरजेचे आहे .
प्रेरणा पतसंस्थेचे गेल्या 32 वर्षापासून ऑडिट वर्ग अ असून या संस्थेमध्ये ठेवी 125 कोटी कर्ज वाटप 78 असून या संस्थेवर सर्वांनी विश्वास ठेवून ठेवी ठेवलेला आहे . या ठेवी जपण्याचे काम सर्व संचालक मंडळाचे असून कर्ज वितरण करताना अनेक वेळा राजकीय कर्ज वितरण न करता सर्वसामान्यांची गरज पाहून कर्ज वितरण केले आहे . प्रत्येकाने ठेवी ठेवताना जास्त व्याजदर कुठे मिळेल चा विचार करू नका हा जो विचार करीन त्याचे मुद्दलही परत मिळेल याची गॅरंटी नाही . त्यामुळे ठेवीवर दहा टक्के व्याज हे नियमानुसार आहे 2009 पासून मल्टीस्टेट बँकेची स्थापना सुरू होऊन बँका कार्य झाले आहेत, त्या माध्यमातूनही मोठी चळवळ उभी राहिली आहे . सर्वसामान्यांच्या गरजा भागवण्यासाठी पतसंस्थेची निर्मिती झाली असून त्या पतसंस्थेवर विश्वास ठेवून सर्वसामान्य जनता ठेवी ठेवत आहे आणि त्या ठेवी पुन्हा त्यांच्या व्याजासह देणे हे पतसंस्थेचे आद्य कर्तव्य आहे . ब्राह्मणीत प्रेरणा पतसंस्थेचे शाखा सुरू करून सर्वसामान्य व्यापारी शेतकरी यांना न्याय देण्याचे काम करू असे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले . सहाय्यक निबंध रावसाहेब खेडेकर म्हणाले की , अनेक ठिकाणी पतसंस्थेची निर्मिती झाली परंतु पतसंस्थेचे निकष व नियम पतसंस्थेने पाळल्यामुळे अनेक पतसंस्था बंद पडले आहेत . परंतु प्रेरणा ही पतसंस्था नियमाचे काटेकोर पालन करून सर्वसामान्य ग्राहकांना न्याय देण्याचे काम करत आहे . त्यामुळे या ठिकाणी ठेवलेली ठेव ही निश्चितच ठेवीदाराला फायदेशीर राहील संस्थेचे नियमाप्रमाणे तसेच शासनाच्या घालून दिलेल्या नियमाचे पालन करत असून त्यामुळे या ठिकाणी ठेवलेली ठेव ही सुरक्षित राहील असे सहाय्यक निबंधक खेडेकर म्हणाले . यावेळी शिक्षक दिनानिमित्त या परिसरातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला . यावेळी डॉ तनपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे,बाळकृष्ण बानकर भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर, साई आदर्शच अध्यक्ष शिवाजीराव कपाळे,रंगनाथ मोकाटे साहेबराव दुशिंग सरपंच सुवर्णा बानकर, प्राअश्विनी बानकर, कारखान्याच्या संचालिका वैशाली तारडे ,प्रमोद तारडे ,भास्कर ढोकणे, विजयराव बानकर ,बाळासाहेब देशमुख ,शब्बीर शेख ,त्रिंबकराव हापसे, दत्तात्रय आडसुरे, विठ्ठल मोकाटे गुरुजी, आण्णासाहेब चोथे, बाळकृष्ण बानकर, सुनिल अडसुरे, सुजित वाबळे, रामचंद्र काळे, आबासाहेब वाळुंज व्हाचेअरमन मच्छिंद्र हुरुळे अशोक उऱ्हे विष्णुपंत वर्पे राजेंद्र वर्पे राजेंद्र गांडुळे अशोक ओहोळ शिवाजी उऱ्हे आदी यावेळी उपस्थित होते. सुत्रसंचालन गणेश हापसे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. वेणूनाथ लांबे यांनी मानले.



Post a Comment
0 Comments